*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448*
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील यांच्यावर लोकसभेच्या तोंडावर जाणीवपूर्वक खोटा गुन्हा दाखल केला असला तरी काँग्रेस पक्ष डॉ. धवलसिंह यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार असल्याची ग्वाही पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली. पुणे येथील काँग्रेस भवन येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसची पश्चिम महाराष्ट्र आढावा बैठक प्रभारी रमेश चेनिथल्ला यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीत सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचा अहवाल अभिषेक कांबळे यांनी सादर केला. त्यानंतर डॉ.धवलसिंह मोहिते पाटील यांच्यावर लोकसभेच्या तोंडावर जाणीवपूर्वक दाखल झालेल्या खोट्या गुन्ह्याची माहिती प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रभारी चेनीथल्ला यांना दिली. व या घटनेचा निषेध करत नाना पटोले यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पूर्णपणे धवलसिंह मोहिते पाटील यांच्या पाठीशी असल्याचेही सांगितले.
यावेळी माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार प्रणिती शिंदे आदी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा