*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.--9730 867 448*
शिवसेनेचे आमदार राजन साळवी यांच्या घर, हॉटेलवर धाड, तपासणीसाठी एसीबी पथक आज सकाळी अचानक दाखल.
या एसीबी च्या पथकात डी वाय एस पी सुशांत चव्हाण याच्या पथका सह 20 अधिकारी कर्मचारी दाखल झाले आहेत.
आमदार राजन साळवी घरी एसीबीची टीम ही सकाळी च दाखल झालेले असून त्यामध्ये अधिकारी, कर्मचारी यात समावेश असून या एसीबीच्या पथकाकडून राजन साळवी याच्या घरांची झाडझडती घेतली जात आहे.
एकाच वेळी तीन ठिकाणी धाडी
त्यांचे राहते घरी, भावाच्या घरी व त्यांच्या मालकीच्या हॉटेल मध्ये ही धाड पडली आहे. आमदार राजन साळवी हे घरी उपस्थित आहेत त्यांच्याकडून पूर्णपणे सहकार्य करण्याची भूमिका घेतली गेली आहे साळवी यांना यादी अनेक वेळेला चौकशीसाठी बनवण्यात आले होते त्यावेळी त्यांनी पूर्णपणे सहकार्य केले होते आज अचानक त्यांच्या निवासस्थाने व व्यवसायावर धाडी घालण्यात आल्या आहे.
*सौजन्य*
*कोकण न्यूज*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा