उपसंपादक----नुरजहाँ शेख
टाइम्स 45 न्युज मराठी
स्वराज्याची जननी राष्ट्रमाता जिजाऊ माँ साहेब यांची ४२५वी तर स्वामी विवेकानंद यांची १२८ जयंती दि मॉडेल विविधांगी प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय माळीनगर येथे उत्साहात साजरी करण्यात आली.प्रतिमेचे पूजन प्रशालेतील शिक्षिका वैशाली बनकर व आशा रानमाळ यांचे हस्ते करण्यात आले.या प्रसंगी व्यासपीठावर प्रशालेचे प्राचार्य प्रकाश चवरे,उपप्राचार्य कलाप्पा बिराजदार,पर्यवेक्षक रितेश पांढरे,शिक्षक रघुनाथ वाघमारे, वसंत पिंगळे,रामदास जाधव, संजय पवार,बाळासाहेब भोसले व्यासपीठावर उपस्थित होते. विद्यार्थिनी सृष्टी बनकर,श्रद्धा बोरावके,ओम मोरे,सिद्धी हेगडकर,जोया शेख,निलोफर शेख,सिद्धी तुपे यांनी भाषणे केली.तसेच सृष्टी काळे व सातवी मधील मुलींनी जिजाऊंचा सुंदर देखावा करून गीत सादर केले.सर्वांना मान्यवरांच्या असते पेन देऊन कौतुक करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी रूपाली नवले,किशोरी चवरे,सुखदा विधाते यांचे सहकार्य लाभले. सूत्रसंचालन प्रांजली साळुंखे हिने केले तर आभार रूपाली नवले यांनी मानले.सर्व शिक्षक,शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा