*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.--9730 867 448*
लग्नपत्रिकेचा आशय
"आम्हाला माफ करा ,सुन्नत नुसार (प्रथे प्रमाणे) येथे जेवण नाही . लग्नानंतरच्या जेवणासारख्या या "प्रथेमुळे" आपला "समाज" अनेक आर्थिक आणि सामाजिक समस्येने ग्रासला आहे ". अशा आशयाची लग्नपत्रिका आज भारतात "लक्ष्यवेधी" आणि चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहे .
खरंचं मुस्लिमांनी आपल्या विवाहाच्या पवित्र विधीनंतर जेवण देण्याची प्रथा बंद करावी का ??? मुस्लिमोत्तर "अन्य बांधवानीही " या प्रबोधनात्मक लेखाबाबतीत गांभीर्याने विचार करावा .
विवाहाला आलेल्या निमंत्रितांना अर्थात "एका व्यक्तीचा" विचार करता, एका जेवणाच्या ताटाला कमाल 250 रुपये खर्च येतो. निमंत्रित पाहुणे आप्त - स्वकीयांची संख्या "800" झाली तर त्याचे 2 लाख रुपये होतात. जेवण रद्द केले तर आपोआप गरीब पित्याचे 2 लाख रुपये वाचतात .मुलाकडील (मोजक्या) लोकांना जेवण दिले तरी बाकीचे बरेचसे पैसे वाचतील .
तात्पर्य गरीब वडिलांचा लग्नाचा अर्धा" खर्च अर्थात "50% रक्कम" आपोआप वाचेल.
श्रीमंत मुस्लिम 1000 ते 5000 लोकांना विवाहानंतर त्यांच्या पाहुण्यांना -मित्रपरिवाराला जेवणाचे निमंत्रण देतो .लाखो रुपये खर्च करतो . "आर्थिक सुबत्ता" असणाऱ्या श्रीमंत मुस्लिमांनी कितीही पैसे खर्च केले तरी त्यांना काही फरक पडत नाही. जेवणाचा विषय हा केवळ गरीब वडिलांच्या साठी मर्यादित आहे याची कृपया "नोंद" घ्यावी. आज
सिंधी समाजात विवाह कार्यक्रमात जेवणाचे 50 पदार्थ असतात .एक ताट 1200 ते 1500 रुपयांपर्यंत असते . 50 पदार्थ / मिष्ठान्न एक व्यक्ती खाऊ शकेल का ??? अन्नाच्या नासाडीमुळे सिंधी बांधवांनीही याबाबत "विचारविमर्श" सुरु केलेला आहे .महाराष्ट्राबाहेर काही गावात ताटात फक्त 6 पदार्थाना परवानगी आहे. 7 वा पदार्थ जेवणात दिसला की पाहुणे "जेवणाला" नमस्कार करतात व निघून जातात ."
सिंधी बांधवांची गरीब व्यक्तीचा अपमान होऊ नये घेतली गेलेली ही "दक्षता" "अभिनंदनीय" आहे .
वस्तुतः गरीब ,ज्याची आर्थिक कुवत नाही त्याच्या मुलीच्या लग्नात त्याची "ऐपत" नसेल तर त्याने काय करावे ?? कित्येक गरीब मुस्लिम कर्ज काढून मुलीचे लग्न करतात . मुलीच्या पहिल्या डिलिव्हरीचा (प्रसूतीचा) खर्च उचलतात . नातू जन्माला येतो ,परंतु काढलेल्या कर्जाचे "10 हफ्ते" देखील तो "बाप" भरू शकत नाही ही "शोकांतिका" आहे .
विवाहात मुलीला सोने द्यायची प्रथा आहे . किमान " 5 तोळे" सोने द्यायचे तर त्याचे 3 लाख होतात ."गरीब - मध्यमवर्गीय" बाप ते पैसे कुठून आणणार ?? विवाहात दहेज ( रुखवत - संसार सेट) अर्थात भांडी ,कपडे, इलेक्टिक वस्तू ,बेड" ,मंडप " डेकोरेशन , फर्निचर व अन्य वस्तू द्याव्या लागतात . त्यासाठी तो गरीब बाप पैसे कुठून आणणार ??
कित्येक मुस्लिमाना यादी पे शादी करावयाची असते तथापि (वराकडील) मुलाकडील लोक याला "तयार" नसतात. त्यांना "धुमधडाक्यात" लग्न हवे असते .अशा वेळी या गरीब बापाने काय करावे ???
लग्नामुळे आधीच कर्जाचा डोंगर ..त्यामुळे मुलीच्या कुटुंबप्रमुखाला आर्थिक गाडा चालविणे अवघड होते. त्यामुळे कित्येकदा घरातील "महिलांना" कामाला जाण्याची वेळ येते किंवा लहान मुलीला कामावर पाठवावे लागते .घरातील चांगले - सोशिक वातावरण आणि बाहेर नजरेने बलात्कार करणारे काही "गिधाडे" टपून बसलेली.... त्यातून त्या तरुणीचे नशीब बलवत्तर असेल तरचं ती वाचते, अन्यथा नाही .
दुर्दैवाने कित्येक गरीब कुटुंबात अशी उदाहरणे आढळली आहेत.
तात्पर्य सामाजिक आणि कौटुंबिक कलह आणि अस्थिरता निर्माण करणाऱ्या ,दिखाऊ सन्मानासाठी हा "खोटा खटाटोप" का ??? एका लग्नाने गरीब मनुष्य 5 वर्ष मागे जात असेल ,त्याची प्रगती खुंटत असेल तर लग्नाचा आणि जेवणाचा हा बडेजाव का ?? लग्न कितीही चांगले करा ..लोक नावे ठेवतातच .लोकांचे चांगल्या लग्नाचे सर्टिफिकेट मिळवण्यासाठी इतका "त्याग" आणि अशी कुटुंबाची कुर्बानी का ???
गगनाला भिडणारी महागाई ,बेरोजगारी मुळे आधीच सर्वसामान्य माणूस अर्धमेला झाला आहे ..त्यात लग्न म्हणजे अंगावर काटा आणि टेन्शन आलेले असते . त्यामुळे भविष्यात "आर्थिक कमकुवत" असणाऱ्या व्यक्तीला आपणासारख्या "सजग": व जागृत समाजाने लग्नात जेवण नको ..असे सांगितले पाहिजे. तुमच्या पाहुण्यांपुरते तुम्ही जेवण करा .आम्हाला नको हा "अभिप्राय" तुमचा असायला हवा .
सर्वधर्मिय समाजाने आता बदलले पाहिजे . मग "स्वतःपासूनच" आपण हा बदल स्वीकारला तर ??? प्रयत्न तर करून पाहूया ..आपल्या एका प्रयत्नाने गरीब मनुष्य कर्जबाजारी होण्यापासून वाचेल आणि त्यांचे "आशीर्वाद" ही लाभतील हें निश्चित !
इकबाल बाबासाहेब मुल्ला
( पत्रकार )
संपादक - सांगली वेध ,
संपादक - वेध मीडिया न्यूज
*मोबाईल - 8983587160






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा