*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.--9730 867 448*
रविवार दिनांक 7 जानेवारी 2024 रोजी धवलनगर येथील बाबासाहेब गोडसे यांच्या शेतात रात्रीच्या वेळी बिबट्या पाहिल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता परंतु तो बिबट्या नसून तरस असल्याचे वनविभागाने घोषित केले होते परंतु परत तीन ते चार दिवसात दिनांक 11 जानेवारी रोजी देशमुख मळा, एकतपुरे वस्ती, परिसरात बिबट्या दिसल्याचा ग्रामसुरक्षा दलाने पाहिल्याने देशमुखमळा ,चौंडेश्वरवाडी, यशवंतनगर ,भागातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे देशमुखमळा येथील महेश देशमुख यांच्या गोठ्यावरील रेडी वर हल्ला करून रेडी चे पूर्ण शरीर फाडून छिन्नविछीन्न केल्याचे निदर्शनास आले
त्यामुळे या परिसरात घाबरटीचे वातावरण निर्माण झाले आहे त्यामुळे एकच चर्चेचा विषय बनला आहे या घटनेनंतर अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली आणि सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील कारखान्याचे सुरक्षा रक्षक हे शोध घेत आहेत वन विभागाचे म्हणणे आहे की तो तरस आहे परंतु ही कृत्य बिबट्यासारखे दिसून येत असल्याने या भागातील नागरिकांना आपल्या पाळीव प्राण्यांची तसेच स्वतःची काळजी लागली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा