Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, २१ ऑगस्ट, २०२५

*लक्ष्मीबाई कन्या प्रशालेच्या विद्यार्थिनींनी पर्यावरण पूरक गणपती बनवण्याचा घेतला आनंद*

 


विशेष---प्रतिनिधी*

  राज(कासिम) -मुलाणी* 

 टाइम्स 45 न्यूज मराठी


लक्ष्मीबाई कन्या प्रशालेच्या विद्यार्थिनींनी पर्यावरण पूरक गणपतीबप्पा बनवून

 पर्यावरण पूरक गणपती बनवण्याचा आनंद घेतला

            शिक्षण प्रसारक मंडळ , अकलूज संचलित लक्ष्मीबाई कन्या प्रशाला, यशवंतनगर प्रशालेत विद्यार्थिनींना पर्यावरण पूरक गणपती तयार करण्याची कला आत्मसात व्हावे या कारणासाठी पर्यावरण पूरक गणपती तयार करणे बाबत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले, या कार्यशाळेत विद्यार्थिनींनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला व आपल्या हाताने श्री स्वामी समर्थ , बालगणेश , बालकृष्ण अशा व अशा अनेक रुपातील पर्यावरण पूरक गणपती तयार करण्याचा आनंद घेतला व दरवर्षी घरी हाताने तयार केलेल्या गणपतीची च प्रतिष्ठापना करणार असा संकल्प बोलून दाखवला. गणपती तयार करण्यासाठी बॉम्बे क्ले ( मुंबई माती) चा वापर करण्यात आला बॉम्बे क्ले पासून तयार केलेले गणपती पाण्यात लगेच विरघळतात ,विरघळलेले मातीयुक्त पाणी घरातील झाडाला घालून गणपती मूर्तीची होणारे विटंबना थांबवता येते.

पर्यावरण पूरक गणपती तयार करणे बाबतची कार्यशाळा प्रशालेत राबवण्यासाठी प्रशालेच्या मुख्याध्यापिका अनिता पवार यांचे मार्गदर्शन लाभले.पर्यावरण पूरक गणपती तयार करण्यासाठी विद्यार्थिनींना प्रशालेचे कलाशिक्षक विशाल लिके यांनी मार्गदर्शन केले,प्रशालेतील सर्व शिक्षकांनी कार्यशाळेसाठी सहकार्य केले.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा