Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, ३० जानेवारी, २०२४

*महाविकास आघाडीच्या कामाचा जोर वाढला!!! मुंबईत आज होणार महत्त्वाची बैठक--" हे नेते" राहणार उपस्थित*...

 


*टाइम्स 45 न्युज मराठी*

*मो.9730 867 448*

             संपूर्ण देशभरामध्ये आगामी निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. सोमवारीच लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्यसभा निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे. या घोषणेनंतर सर्वच पक्षांनी निवडणूकांच्या तयारीला जोरदार सुरुवात केली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर राज्यात महाविकास आघाडीमध्ये देखील महत्वाची बैठक पार पडणार आहे. आज दुपारी ठीक दोन वाजता नरिमन पॉईंट येथील ट्रायडेन्ट हॉटेलमध्ये ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीमध्ये आघाडीचे निवडणुकी संदर्भात रणनीती ठरवण्यात येईल असे म्हटले जात आहे.

बैठकीला कोण येणार?

आज होणाऱ्या महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत, विनायक राऊत उपस्थित असतील. तसेच राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार जितेंद्र आव्हाड उपस्थित राहतील. यांच्याबरोबर काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड हे सर्व मंडळी उपस्थित राहणार आहेत. तर काही इतर नेते देखील उपस्थित राहणार असल्याचे समोर आले आहे.

बैठकीचा हेतू काय?

सध्या लोकसभा निवडणुका तोंडावर आल्यामुळे महाविकास आघाडीने हालचाली करण्यास सुरुवात केली आहे. यात राज्यातील शिंदे-फडणवीस-पवार सरकार पाडण्यासाठी भाविकास आघाडी एकत्र लोकसभा निवडणूक लढणार आहे. त्यासाठी जागावाटप देखील करण्यात येणार आहे. त्यामुळे आजच्या या बैठकीत जागा वाटपासंदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे. मात्र या बैठकीला वंचितचे प्रकाश आंबेडकर उपस्थित राहणार नाहीत. परंतु त्यांच्या बाजूने धैर्यवर्धन पुंडकर उपस्थित असतील.

दरम्यान, राज्यात राज्यसभेच्या 56 जागांच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, येत्या 27 फेब्रुवारी रोजी या सर्व जागांसाठी मतदान होणार आहे. 8 फेब्रुवारी रोजी निवडणुकीच्या अधिसूचना जारी केली जाईल. या निवडणुका लोकसभेच्या निवडणुकांपूर्वी होणार असल्यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागून राहणार आहे.

               *सौजन्य*

             *कोकण न्यूज*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा