Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, १३ फेब्रुवारी, २०२४

*वाफेगाव येथील बंधाऱ्यास तत्काळ नवीन बरगे बसवण्यात यावेत------- गणेश इंगळे* *अन्यथा..... 18 फेब्रुवारी 2024 रोजी वाफेगाव बंधाऱ्यावर युवा सेनेच्या वतीने मटके फोड आंदोलन*

 


*टाइम्स 45 न्युज मराठी*

*मो.9730 867 448

              वार्ताहार: शिवसेना युवासेना सचिव वरून सरदेसाई यांच्या आदेशाने युवा सेना विभागीय सचिव अक्षय ढोबळे व युवा सेना जिल्हा संपर्क प्रमुख उत्तम आयवळे यांच्या मार्गदर्शनाखाली युवा सेना जिल्हा प्रमुख गणेश इंगळे व बाभुळगावचे सरपंच भुषण भैय्या पराडे पाटील यांच्या वतीने वाफेगांव येथील बंधाऱ्यास तात्काळ बरगे बसवण्यात यावे अन्यथा युवा सेनेच्या वतीने रविवार दिनांक 18 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी दहा वाजता वाफेगांव येथील बंधाऱ्यावर्ती मडके फोडो आंदोलन करण्यात येईल अशा आश्याचे पत्र सोलापूर येथील उपअभियंता व जनसंपर्क अधिकारी लाभ क्षेत्र विकास प्राधिकरण चे श्रीमती वैशाली कोरे यांना निवेदन देण्यात आले. महाराष्ट्रात बरेच तालुके दुष्काळग्रस्त आहेत .त्यात सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस आणि माढा तालुका दुष्काळग्रस्त आहे . माळशिरस तालुक्यातील वाफेगाव येथे भीमा नदीवर सण 2009 ते 2010 ला हा बंधारा बांधण्यात आला .असून त्या बंधार्‍यात सन 2012 मध्ये पाणी अडविण्यास सुरुवात झाली .वाफेगाव येथील बंधाऱ्याचा संगम शेवरे बाभुळगाव माळेगाव वाफेगाव मिटकलवाडी बेंबळे या गावास शेतीसाठी व पिण्याच्या पाण्यासाठी उपयोग होतो. वाफेगाव येथील बंधाऱ्यास एकूण 783 दरवाजे आहेत. या बंधाऱ्याची पाणी अडवण्याची क्षमता ही पाच मीटर उंच आहे. परंतु गेली अनेक वर्ष झाले या बंधाऱ्यात फक्त अडीच मीटरनेच पाणी अडविले जात आहे. कारण या बंदार्‍याचे दरवाजे कुजून खराब झाले असल्याने पाटबंधारे खात्याकडे गेली अनेक वर्ष दरवाजे उपलब्ध होऊ शकले नाहीत. त्यामुळे पाणी अडवण्याची क्षमता ही 2.5 मीटर वरती येऊन ठेपली आहे. या 2.5 मीटर पाणी अडवण्याचे क्षमतेच्या दरवाजा मधील अनेक दरवाजे हे सतत काड घाल करण्यामुळे बेंड / वाकडे झाले आहेत. त्यातील काही दरवाजे हे दहा ते बारा वर्षाचे असल्याने कुजून गेले आहेत. त्यामुळे वाफेगाव येथील बंधाऱ्यास मोठ्या प्रमाणात गळती लागली असल्याकारणाने त्या बंधार्‍यात पाणी जास्त दिवस शिल्लक राहत नाही .शासनाच्या नियमानुसार ज्या बंधार्‍यास जेवढे दरवाजे असतील त्या दरवाज्याच्या 10 % टक्के दरवाजे शिल्लक ठेवावे लागतात. त्यामुळे तात्काळ वाफेगाव येथील बंधाऱ्यास 861 दरवाजे तात्काळ उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी पाटबंधारे खात्याकडे युवा सेनेने वारंवार केली होती . परंतु आज तागायत नवीन दरवाजे उपलब्ध करून दिलेले नाहीत शनिवार पर्यंत दरवाजे उपलब्ध न करून दिल्यास युवा सेनेच्या वतीने रविवार दिनांक 18 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी दहा वाजता मडके फोडो आंदोलन करण्यात येईल असा ईशारा युवा सेनेच्या वतीने करण्यात आला आहे.यावेळी निवेदन देताना शिवसेना जिल्हा प्रसिद्धी प्रमुख अवधूत कुलकर्णी ,बबलू पराडे पाटील, संग्राम अण्णा पराडे पाटील, मयूर पाटील ई शेतकरी उपस्थित होते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा