अकलुज ----प्रतिनिधी
केदार लोहकरे
टाइम्स 45 न्युज मराठी
ग्रीको रोमन कुस्ती स्पर्धेत सोलापूर जिल्ह्यातून पै.हर्षवर्धन आनंद गुरव व पै.निलेश यादव यांनी अनुक्रमे ६७ व ७७ किलो वजनी गटात प्रथम क्रमांक मिळवला आहे.त्यांची राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी सोलापूर जिल्ह्यातून निवड झाली आहे.ते दोघेही गोधबा पाटील कुस्ती केंद्र खुडूसचे मल्ल असून त्यांना वस्ताद महादेव ठवरे- पाटील,सागर वाघ,भैय्या गोफणे व त्यांच्या सहकाऱ्यांचे मोलाचे मार्गदर्शन झाले हे दोघेही पैलवान सध्या इंदापूर येथे उच्च शिक्षण घेत असून त्यांच्या या निवडीमुळे पाणीव व खुडुस परिसरात कुस्ती क्षेत्रात आनंदाचे वातावरण पसरले आहे.
त्यानिमित्त सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखाना शंकरनगरचे चेअरमन जयसिंह मोहिते-पाटील व अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते- पाटील तसेच महाराष्ट्र केसरी मल्ल रावसाहेब मगर यांनी उभयतांचा शाल व श्रीफल देऊन सत्कार केला व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.यावेळी आनंद गुरव,तुकाराम उबाळे (मास्तर)व इतर कुस्तीप्रेमी हजर होते.त्यांचे या निवडीमुळे सर्वत्र कौतुक होत आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा