*अकलुज ---प्रतिनिधी*
*केदार लोहकरे*
*टाइम्स 45 न्युज मराठी.
अकलूजच्या शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील गृहविज्ञान महिला महाविद्यालयात रत्नाई महोत्सव २०२३-२४ या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने आज फॅशन शो चे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये साडीपासून शिवलेले ड्रेस, साडीची बदलती फॅशन,विविध प्रांतीय पोशाख,आधुनिक ड्रेसेस, नववधूचा पेहराव इत्यादी थीमच्या अनुषंगाने सादरीकरण करण्यात आले. महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी अतिशय उत्साहाने यामध्ये सहभाग नोंदविला.सदर फॅशन शोचे परीक्षण मेघना कुलकर्णी व सुनिता काटे यांनी केले.या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी डॉ. राजश्री निंभोरकर व सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ.छाया भिसे यांनी परिश्रम घेतले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा