*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448
अकलूज, ता.१९: येथील सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च, शंकरनगर,अकलूज या अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये दि. १९/२/२०२४ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रविण ढवळे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर कु. सानिका जगताप (द्वितीय वर्ष काॅम्प्युटर डिग्री विभाग) चि. करण मोरे(तृतीय वर्ष काॅम्प्युटर डिग्री विभाग) चि.दर्शन मोरे (द्वितीय वर्ष मेकॅनिकल डिप्लोमा विभाग) श्री.सोमनाथ घाडगे (शिपाई- कर्मचारी वर्कशॉप डिपार्टमेंट) यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल आपले मनोगत व्यक्त केले.
त्यानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.प्रविण ढवळे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याची माहिती दिली. त्यामध्ये त्यांनी महापुरुषांचे आचरण केल्यानंतर माणसांची प्रगती होऊ शकते व समाज परिवर्तन करायला मदत होते. तसेच विद्यार्थ्यांनी स्वतःची काळजी घेणे,दैनंदिन व्यायाम, सात्विक आहार घेणे गरजेचे आहे असे सांगितले. तसेच सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्याकडून व्यसनांपासून लांब राहण्याचा संकल्प करून घेतला.
त्यानंतर प्रथम वर्ष पदवी विभागातील विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त शिक्षणापासून वंचित असलेल्या ऊसतोड कामगारांच्या मुलांमध्ये , शैक्षणिक साहित्य वाटप करून त्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले.
सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.प्रविण ढवळे, कार्यालयीन अधीक्षक श्री. शब्बीर शेख, सर्व विभागाचे विभागप्रमुख, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून प्रा.श्रीकांत कासे यांनी काम पाहिले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा