Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, २६ फेब्रुवारी, २०२४

*व्यवस्थेनं तोंडावर बोट ठेवून मुकं केलेल्यांना बोलत करण्यासाठी "मूकनायक "वृत्तपत्राचा जन्म-- उत्तम कांबळे..*

 


*अकलुज ----प्रतिनिधी*

*केदार लोहकरे*

*टाइम्स 45 न्युज मराठी

                व्यवस्थेनं ज्यांच्या तोंडावर बोट ठेवुन त्यांना मुकं केलं होतं,त्यांना बोलतं करण्यासाठी मूकनायक वृत्तपत्राचा जन्म झाला, मूकनायकाने आत्ता ठोकनायक झालं पाहीजे तर मूकनायकाच्या नावाने अकलूज येथील मूकनायक प्रतिष्ठान हे देशातील पहिले प्रतिष्ठान आसलंयाच मत जेष्ठ साहित्यिक,विचारवंत उत्तम कांबळे यानी व्यक्त केले.



         मूकनायक प्रतिष्ठानच्या वतीने अकलूज येथे मूकनायक परिसंवाद-२०२४ व मूकनायक सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लेखक बा.ना धांडोरे हे होते.यावेळी मूकनायक पुरस्काराचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी पुढे बोलताना उत्तम कांबळे म्हणाले की, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी काढलेल्या क्रांतीकारी वृत्तपत्र मूकनायकाच्या नावाने प्रतिष्ठान काढावे व त्या माध्यमातून वैचारीक मेजवानीचे आयोजन करावे ही संकल्पना मोठी आहे. बाबासाहेबांच्या वृत्तपत्राचा प्रवास मूकनायक पासून सुरु होवुन प्रबुद्ध भारत पर्यंत ३६ वर्ष प्रदिर्घ चालत राहीला.तो केवळ दोन तासात कुठल्याही विचारवंतांना मांडणे अशक्य आहे.आम्ही माणसं आहोत,माणसातंच येणार आणि मानसारखं जीवन जगणिर ही क्रांती मुक्यांच्या मनात पेरणारा पहिला महानायक म्हणजे बाबासाहेब आंबेडकर आहेत.बाबासाहेब जन्माला आले नसते तर मुक्याच्या वेदनांना वाचा फुटली नसती. बाबासाहेबांचा जन्म म्हणजे अंधाराचा मृत्यु आणि उजेडाचा जन्म होय.बाबासाहेब हे फक्त दलिताचेच नेते नव्हते तर ते संबध देशाचे नेते होते. बाबासाहेबांनी वृत्तपत्राच्या माध्यमातून शेतकरी, कष्टकरी, कामगार,दलित शोषती आणि वंचितांच्या व्यथा मांडण्याचे काम केले असे सांगत वृत्तपत्राचा जन्म ते सद्याची भरकटलेली प्रसार माध्यमे यावर त्यांनी सखोल मत मांडले.मूकनायकच्या निर्मीतीसाठी छत्रपती शाहू महाराजांची मदत व कोल्हापुरच्या दत्तोपंत पवार यांची जाहीरात देवुन केलेले सहकार्य यावर प्रकाश टाकुन बाबासाहेबांची वृत्तपत्र ही पैशा अभावी बंद पडली असे सांगत इतिहासाच्या क्रांतीकारी पानावर नजर टाकते अवश्यक असून, पुस्तके केवळ सजावटीसाठी न ठेवता त्याचे वाचन करणे अवश्यक आसल्याचेही ते म्हणाले.

          यावेळी शिवाजी शिंदे यांना पत्रकारीता,ॲड.धनंजय बाबर यांना विधिज्ञ,प्रविण लोंढे यांना शिक्षक,गणपत जाधव यांना साहित्यिक व ज्ञानदीप शिक्षण संस्थेचे प्रा.एम डी ढोबळे यांना मूकनायक पुरस्कार २०२४ ने गौरविण्यात आले.

         या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रतिष्ठानचे अध्यक्ष नागेश लोंढे यांनी केले तर आभार आनंदकुमाल लोंढे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुकनायक प्रतिष्ठानचे सागर खरात,डी.एस.गायकवाड, बाळासाहेब गायकवाड,सुजित सातपुते व कैलास कांबळे यांनी परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा