Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, २ फेब्रुवारी, २०२४

मॉनिटर पदासाठी फीनिक्स स्कूल मध्ये रंगले अटी तटी चे राजकारण

 


उपसंपादक - नूरजहाँ शेख

टाइम्स 45 न्यूज मराठी

                 दिल्लीचे राजकारण चिमुकल्यांच्या शाळेत पोहचले 


माळशिरस तालुक्यातील लवंग (२५/४) येथील फिनिक्स इंग्लिश स्कूलमध्ये मॉनिटर या पदासाठी दोन विद्यार्थ्यांची निवड करण्यात यावी अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली.ही मागणी रास्त असल्याने शाळेच्या संचालिका नूरजहाँ शेख यांनी निवडणूक घेण्यासाठी परवानगी दिली व विद्यार्थ्यांच्या सहमतीनेच मॉनिटर निवडला जाईल असे सांगितले विद्यार्थ्यांमधून दोन नावे पुढे आली.एक सारा शेख आणि दुसरा रुद्र भोळे हे उमेदवार म्हणून रिंगणात उभे राहीले आणि प्रचारास सुरुवात झाली . कोणाला निवडून आणायचे म्हणून सर्व विद्यार्थी आपसात चर्चा करू लागले.दोन्ही उमेदवार मत मिळवण्यासाठी मतदात्यांना खूष करण्यासाठी चॉकलेट्स, फुले,पेन्सिल देण्याचे आश्वासन देऊन बहुमताने निवडून येण्यासाठी प्रयत्न करू लागले. मतदाते ही दोन्ही उमेदवारांना विचारत होते मी तुला मत देईन पण आधी तू सांग मला काय देशील ? खरोखरचं हा प्रश्न ४ ते ५ वर्षाच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या मनात येणे योग्य की अयोग्य असा प्रश्न पडतो. थोडक्यात टिव्हीवरील राजकीय घडामोडीचे नाट्यरंग पाहून भातुकलीचा खेळ खेळण्याच्या वयात चिमुकले खेळू लागले राजकारणातील डावपेच.



       शाळेतील दोन्ही उमेदवारांना समान मते मिळाली तेव्हा भावी माॅनिटरने मुलांना अमिष दाखवून मत फोडण्याचे राजकारण सुरु केले.सारा गटातील काव्या ह्या मुलीने रुद्र गटातील मुलींना आपल्या गटात गोड गोड बोलून आणले आणि सारा शेखचा विजयी झाला.मॉनिटर पदाची घोषणा होताच विजेता गट आनंदाने नाचू आणि हुर्रे म्हणून ओरडू लागले त्यानंतर विजेत्या गटाचा सत्कार आपण केला पाहिजे असे काही मुले म्हणाली.फुलांचा हार घालून मॉनिटरचा सत्कार ही करण्यात आला तेव्हा मॉनिटर म्हणाल्या काव्याने पाच मते आम्हाला मिळवून दिली म्हणून तिचा सत्कार व्हायला हवा.म्हणजे पक्षश्रेष्टीने निष्ठावन्त कार्यकर्तीचे आभार मानले.हे सर्व विद्यार्थी सर्व काही आपल्या मनाने करीत होती.म्हणजेच ते मोठ्यांचे अनुकरण हुबेहूब करीत होती.



       सध्याचे राज्यात चाललेले फोडाफोडीचे राजकारण शाळेतील चिमुकल्यांमध्ये पहायला मिळत आहे. बालमनावर हे तोडा फोडीचे राजकारण परिणामकारक ठरत आहे हि बाब देशातील लोकशाही च्या द्रुष्टीने चिंतेची व घातक नाही का ??




*चौकट

*आपल्यालाच जास्त मते मिळाली पाहिजेत म्हणून उमेदवारांनी वेगवेगळी शक्कल लढवली काहींनी घरातील फ्रिजमधून फळे पळवून आणून मुलांना वाटली तर काहींनी आईच्या पर्समधील अत्तर टिकलीचे पाकिट,नख पॉलिश,बनवाट आंगठी आणून मुलींना वाटली आणि एकाने तर हॉटेलमधून मोठा डबा भरून चायनीज आणून मत देणा-यास खाऊ घालेन अशी ही आश्वासने दिली . मते मिळवण्यासाठी मुलांनी आटोकाट प्रयत्न केले.*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा