Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, ३ फेब्रुवारी, २०२४

*इतरांच्या सांस्कृतिक अजेंड्यावर केलेली टीका ही वांझोटी असते---ॲड.शीतल चव्हाण*

 


*टाइम्स 45 न्युज मराठी*

*मो.9730 867 448*

             *संघ-भाजप त्यांचे सांस्कृतिक राजकारण नेटाने चालवत आहे. देव, देश, धर्म आणि महामानवांच्या प्रतिक व प्रतिमांचा उपयोग करीत आहे. संघ-भाजपच्या या सांस्कृतिक राजकारणाला पर्याय न देता त्यांच्यावर टीका करण्याचा अधिकार कॉंग्रेसला व पुरोगाम्यांना नाही. कारण, उत्सवप्रिय, व्यक्तीप्रेमी, प्रतिमाप्रेमी आणि भावनिक जनतेला दुसरा कुठलाही कार्यक्रम न देता त्यांना संघ-भाजपाच्या सापळ्यातून काढणे अशक्य आहे. म्हणून, संघ-भाजपाच्या सांस्कृतिक राजकारणावर टीका करणारांनी आपण जनतेला कुठले पर्यायी सांस्कृतिक कार्यक्रम देत आहोत याचे आधी आत्मपरीक्षण करावे. आम्ही उमरगा-लोहारा भागात शोभायात्रेला विवेकयात्रेचा, सावरकर गौरव यात्रेला भगतसिंग-सुखदेव-राजगुरु-अशफाक उल्लाह खान विचार यात्रेचा, देवाधर्माच्या पालख्या आणि दिड्यांना पुस्तकपालख्या आणि ग्रंथदिंड्यांचा, गणोशोत्सवाला पुस्तक वाचणाऱ्या गणपतीचा आणि राजकारणासाठी देवा-धर्माचा वापर करण्याला संविधान जागर यात्रेचा पर्यायी कार्यक्रम देत आहोत. लोकांना काय करु नये, काय सोडावे हे सांगत असतानाच काय करावे, काय धरावे याचा पर्यायही द्यावा लागतो. तसा पर्याय न देता इतरांच्या सांस्कृतिक अजेंड्यावर केलेली टीका ही वांझोटी असते.*


© ॲड. शीतल शामराव चव्हाण 

(मो.9921657346)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा