Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, ३ फेब्रुवारी, २०२४

*मुलांच्या विवाहावेळी "प्रीवेडिंग" चे लाड न करता भारतीय संस्कृतीचा" सन्मान राखणे "काळाची गरज...* *इक्बाल मुल्ला,--सांगली*

 



*टाइम्स 45 न्युज मराठी*

*मो.9730 867 448*


        लग्नाआधी आणि साखरपुड्यानंतर

"फोटो शूट" करण्याचा अट्टाहास आणि त्यानंतर तरुण - तरुणींचे मोडलेले लग्न आज कित्येक तरुण तरुणींचे "संसार उध्वस्त" करणारा आणि आई वडिलांसाठी आत्मचिंतन करणारा ठरत आहे .आज प्रिवेंडिंगचा हा "कॅन्सर" धोकादायक ठरत आहे . समुद्रात लग्न आणि आकाशात "सात फेरे" असे चमत्कारिक प्रकार चिंताजनक ठरत आहेत .


 *लग्नाआधी फोटो शूट आणि त्यानंतर तरुणीचा लग्नाला नकार !* 



लग्नाआधी अतिशय हौसेने "हजारो रुपये" देऊन उत्कृष्ठ "फोटो अल्बम " साठी फोटोग्राफर निश्चित केला जातो. नयनरम्य ठिकाणे ,"समुद्र" ,बीच, डोंगर अशा ठिकाणी या जोडप्याना घेऊन तेथे विविध प्रकारच्या "आयडियाज " च्या माध्यमातून अनेक फोटो काढले जातात. त्यादरम्यान त्या दोन जोडप्यांचा "सुसंवाद" होतो. गप्पा च्या ओघात तरुण -तरुणी मनमोकळेपणाने बोलतात. पण त्या भेटी दरम्यान एक "चूक" होते. तो तरुण त्या तरुणीला अनावधानाने त्याचे सिक्रेट सांगतो. आणि त्यानंतर ती तरुणी त्या तरुणाला लग्नाला चक्क "नकार" देते , आणि दुसऱ्या एखाद्या तरुणासोबत लग्न करते . 100 फोटो काढलेल्या आणि सुखी "संसाराची" स्वप्ने रंगवलेल्या त्या तरुणाला हा मोठा "धक्का" असतो. त्यामुळे चिडून तो तरुण त्या तरुणीच्या "पतीचा मोबाईल क्रमांक "शोधून काढून त्याच्या मोबाईल नंबर वर आधी काढलेले 100 फोटो पाठवून देतो . "अनोळखी" तरुणासोबत पत्नीचे 100 फोटो पाहून धक्का बसलेला तो "पतीदेव" त्या तरुणीला "घटस्फोट "देतो . आता तो तरुण आपल्या घरात आणि तो तरुण ही आपल्या घरात असतात . प्रिवेंडिंगचा हा 440 व्होल्ट चा "शॉक "असतो .


 *तोकडे कपडे घालून फोटो काढण्याची हौस आणि सोशल मीडिया !*


अतिशय "तोकड्या कपड्यात" तरुणीचे झालेले फोटोसेशन आणि लाज येईल असा पेहराव सर्वांच्या भुवया उंचावणारा असतो . "छातीवर" फक्त "टॉवेल "गुंडाळून आणि तरुणाला ( सर्व काही ) दिसेल अशा पद्धतीने टॉवेल उघडून काढलेले फोटो सोशल मीडियावर "धुमाकूळ" घालत आहेत. काही ठिकाणी सजवलेला "बेडरूम" लाजत - मुरडत रूममध्ये आलेली ती तरुणी दाखवली जाते. "पाश्चिमात्य" देशाची ही संस्कृती लहान मुलांसाठी अतिशय "घातक" ठरत आहे .

लग्नाआधीच सासर आणि मित्रमंडळींना हें कपल काय उत्तर देत असेल ?? शिवाय सोशल मीडियावर "ट्रोल" होणे हें आलेच .फोटोग्राफर ला आधीच पैसे दिलेले असतात . त्यामुळे तो सांगेल त्यापद्धतीने फोटो काढण्याशिवाय गत्यंतर नसते .या कपलला "आधुनिकता" हवी असते . त्यामुळे "इंटरनेट" पाहून हें तरुण व तरुणीचं फोटोग्राफरला विविध "कल्पना" सुचवतात . यात "फोटोग्राफर"चा यात काहीही "दोष" नसतो.


 *समुद्रात ,धबधबा , डोंगर येथे प्रिवेंडिंग मुळे कित्येक बळी !*


तरुण -तरुणींच्या आग्रहामुळे फोटोग्राफर ला कलात्मक पद्धतीचे फोटो घेणे क्रमप्राप्त असते. भारतात कित्येक ठिकाणी आणि केरळ मध्ये समुद्रात प्रिवेंडिंग करताना कित्येक तरुण - तरुणींना आपला जीव गमवावा लागला आहे .कित्येक तरुणी डोंगर दऱ्यातून पडून मृत्युमुखी झाले आहेत .कित्येक जोडपे भर पावसात केल्या गेलेल्या प्रिवेंडिंग फोटोशूट मध्ये "गंभीर जखमी "झाले आहेत . नावीन्याखाली जीव जात असेल आधुनिकतेचा हा अतिरेक का ???

      *मुलांचे समुपदेशन ही पालकांची जबाबदारी !*


मुलांच्या इच्छा - आकांक्षा पूर्ण करा .तथापि मुलांच्या विवाहावेळी प्रीवेडिंग चे लाड करू नका. लहानपणापासून सांभाळलेल्या मुलाला काही क्षणात गमावू नका ! मुलांचे समुपदेशन ही काळाची गरज आहे . एका क्षणात विवाहाचा ,शेकडो स्वप्नांना तिलांजली देण्याऐवजी मुलांना मार्गदर्शन करा.पालकांच्या समुपदेशनाने तरुण -तरुणी यापासून परावृत्त होतील. व आपल्या "भारतीय संस्कृतीचा" सन्मानही राखला जाईल! 


इकबाल बाबासाहेब मुल्ला

(पत्रकार)

संपादक - सांगली वेध ,

संपादक - वेध मीडिया न्यूज,सांगली .

मोबाईल - 8983587160

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा