Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, ९ फेब्रुवारी, २०२४

तोडणी कामगारांचा मनमानी कारभार ऊस पेटवून तोडण्याचा सपाटा.

 


लक्ष्मीकांत कुरुडकर.

अकलूज(प्रतिनिधी) टाईम्स 45न्यूज.

           माळशिरस तालुक्यात 

 यावर्षी अत्यल्प प्रमाणात पाऊस पडल्यामुळे तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. यातच मागील काही दिवसांपासून उसाचे फड पेटवून तोडण्याचा सपाटा 

 माळीनगर परिसरात ऊसतोड कामगारांकडून सुरू आहे. त्यामुळे ऊस गाळपाला गेल्यावर शेतकऱ्याचे प्रतिटनानुसार आर्थिक नुकसान अधिक होत

आहे. आहे. तांबवे,माळीनगर, वजराई, बिजवडी, संगम या पट्ट्यात उसाचे क्षेत्र जास्त आहे. हिवाळा संपून दिवसेंदिवस उन्हाचा तडाखा वाढायला सुरुवात झाली आहे. अगोदरच तीव्र पाणीटंचाई असूनही कसेबसे ऊसपीक आणले आहे. मात्र, सद्यःस्थितीत विहिरीत पाणी उपलब्ध नसल्याने शेतातील ऊस अडचणीत सापडला आहे. हा ऊस लवकर गाळपासाठी जावा अशी शेतकऱ्यांच्चीची अपेक्षा आहे. त्यामुळे ऊस घालविण्यासाठी शेतकरी धडपड करीत आहेत.

कारखाना प्रशासनाने लक्ष देण्याची गरज--

मागील वीस महिन्यांपासून तळहाताच्या फोडाप्रमाणे उसाचा सांभाळ करून अखेर शेतकर‌यांनाच तो ऊस जाळून टाकावा लागत आहे. अधिकचे नुकसान आणि कालावधी होऊन गेलेला उभा ऊस शेताबाहेर काढायचा तरी कसा? म्हणून शेतकरी आता थेट ऊसतोड कामगारांसमोर फड पेटवून देऊ लागले आहेत. अगोदरच उसाला मोठ्या प्रमाणावर तुरे आले असून वजनात मोठ्या

प्रमाणावर घट झाली आहे. दुसरीकडे ऊसतोड कामगारांना व ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनचालकाला देखील दररोज अधिकचे पैसे द्यावे लागत आहेत. त्यामुळे दररोज हजारों रुपये खर्च करण्याची वेळ ऊस उत्पादक शेतकर्यांवर आली आहे. याबाबत कारखाना प्रशासनाने लक्ष देण्याची आवस्यकता निर्माण झाली आहे.



ऊस पाचट व्यवस्थापन अभियानाचा फायदा काय?---

अगोदर ऊसतोडणी झाल्यानंतर शेतकरी ऊसाचे

 पाचुट पेटवून देत होते. त्यामुळे पर्यावरणाच्या

हानीबरोबरच शेतकऱ्यांचे नुकसान होत होते. मागील काही वर्षापासून महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या माध्यमातून ऊसपाचुट राखण्याचे फायदे लक्षात घेऊन याची माहिती शेतकऱ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहचवण्यासाठी ऊसपाट व्यवस्थापन अभियान' कृषी अधिकारी, प्रभावीपणे राबविण्यात यशस्वी होत आहेत. मात्र, दुसरीकडे शेतकऱ्यांच्या उभ्या उसाला जाळून तोडला जात असल्याने अभियान राबविल्याचा फायदा काय? असा प्रश्न पडत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा