इंदापूर तालुका...... प्रतिनिधी एस. बी. तांबोळी, मोबाईल-8378081147
: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी बुद्रूक येथे राजमुद्रा प्रतिष्ठान व ग्रामस्थांच्या वतीने दोन दिवसीय शालेय शिव-सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. सदरचा महोत्सव महादेवराव बोडके दादा विद्यालयाच्या प्रांगणात उत्साहात पार पडला.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त महाराजांच्या प्रतिमेची पालखीतून गावातून मिरवणूक काढण्यात आली. तसेच सकाळी शिवरायांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले. यावेळी आयोजित स्नेहभोजनाचा लाभही उपस्थितांनी घेतला. महोत्सवात शिवपार्वती इंग्लिश मीडियम स्कूल नरसिंहपूर, माध्यमिक विद्यालय गिरवी, लोकनेते महादेवराव बोडके दादा विद्यालय, तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुतार वस्ती, भंडलकरवस्ती व पिंपरी बुद्रूक येथील विद्यार्थी, विद्यार्थ्यीनी सहभाग घेत आपल्या कलागुणांचा आविष्काराने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.
प्रेक्षकांनी त्यांच्या कलेला दाद देत सर्वच कलाकारांसाठी ५२ हजार रुपयांची बक्षीसे दिली. कार्यक्रमासाठी सहकार्य करणाऱ्या रतन मंडपच्या टिंकू ढवळसकर, अभय शिंदे, निवेदक श्रृष्टी पवार, तुषार बोडके, संजय बोडके आदींचा राजमुट्टा प्रतिष्ठानच्या वतीने बंटी काटकर, गणेश मगर यांनी सन्मान केला. तर मागील एक महिन्यापासून विद्यार्थी कलाकारांची तयारी करून घेणारे शिक्षक सादिक शेख व सहकारी यांचाही सन्मान करण्यात आला.
पिंपरी बुद्रुक पंचक्रोशीतील शाळा विद्यालयांमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम होत असतानाही राजमुद्रा प्रतिष्ठानच्या वतीने परिसरातील अबाल, वृद्ध, महिला, तरुण व नागरिकांसाठी शिवजयंती निमित्त शिव सांस्कृतीक मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात येत आहे. डीजे, डॉल्बी व इतर वायफट खर्चाला फाटा देऊन सर्वांसाठी सांस्कृतीक कार्यक्रम घेऊन एक आगळीवेगळी परंपरा निर्माण केली आहे.
फोटो - पिंपरी बुद्रुक येथे शिवजयंती निमित्त शिव सांस्कृतिक कार्यक्रमात कलाकार कला सादर करताना.
---------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा