Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, २२ फेब्रुवारी, २०२४

*कमी वेळात अचूक निर्णय घेतो तोच खरा गुणवत्ता पूर्ण श्रेष्ठ शिक्षक:--- डॉ. विलास परांजपे*

 


*उपसंपादक -

नूरजहाँ शेख 

टाइम्स 45 न्यूज मराठी

             लोकसंख्येची भरमसाठ वाढ आणि वाढलेली गुणात्मक स्पर्धा यांमुळे सध्या परीक्षेत कितीही जास्त गुण मिळाले तरी ते कमीच वाटतात.त्यामुळे बी.एड.चे प्रशिक्षण घेत असतानाच विद्यार्थ्यांनी शिक्षक पात्रता परीक्षेचा अभ्यास सुरू ठेऊन गुणवत्तापूर्ण श्रेष्ठ शिक्षक बनावे. कमी वेळात अचूक निर्णय घेतो तोच श्रेष्ठ व गुणवत्तापूर्ण शिक्षक होय.असे प्रतिपादन इचलकरंजी शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विकास परांजपे यांनी केले.

          शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर आणि अग्रणी महाविद्यालय योजनांतर्गत येथील यशवंत शिक्षणशास्त्र महाविद्यालयात आयोजित शिक्षक पात्रता परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.कोडोली (ता.पन्हाळा)येथील श्री यशवंत शिक्षण प्रसारक मंडळाचे सेक्रेटरी डॉ.जयंत पाटील यांच्या प्रेरणेतून ही कार्यशाळा उत्साही वातावरणात पार पडली. 

        करंजवडे (ता.वाळवा,जि. सांगली) येथील स्पर्धा परीक्षा तज्ञ प्रा.विश्वनाथ पवार यांनी कार्यशाळेत टिइटी,सिटिइटी, टिएआयटी या शिक्षकी पेशासाठी आवश्यक असणार्‍या स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन केले.यशवंत शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विश्वनाथ पाटील अध्यक्षस्थानी होते.याप्रसंगी इचलकरंजी शिक्षणशास्त्र महाविद्यालयातील प्रा.स्मिता परांजपे,कोल्हापुरातील खराडे बी.एड.कॉलेजच्या प्रा.श्रीमती एस.एस.कुंभार व्यासपीठावर होत्या.

      "बी.एड.प्रशिक्षणाचा उपयोग नोकरीमध्ये तर होतोच,पण त्याचबरोबर कुटुंब आणि समाज घडविण्यासाठीदेखील होतो," असे प्रा.विश्वनाथ पवार म्हणाले. तर प्राचार्य डॉ.विश्वनाथ पाटील यांनी बी.एड.विद्यार्थ्यांनी नैराश्य झटकून ज्ञान व कौशल्य आत्मसात करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले.

              याप्रसंगी आकाश पाटील (महावीर महाविद्यालय, कोल्हापूर),तेजस्विनी विश्वास सुर्यवंशी (तात्यासाहेब कोरे शिक्षणशास्त्र महाविद्यालय, वारणानगर),ऋषिकेश सासणे ( बी.एड.कॉलेज, कागल) या प्रशिक्षणार्थीबरोबरच प्रा.श्रीमती एस.एस.कुंभार (खराडे बी.एड. कॉलेज,कोल्हापूर) यांनी समारोपात मनोगत व्यक्त केले. मान्यवरांच्या हस्ते उपस्थितांना प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली. 

        या कार्यशाळेचे समन्वयक प्रा.अतुल बुरटुकणे यांनी स्वागत केले.प्रा.संजय जाधव यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. प्रा.श्रीमती गुलनास मुजावर यांनी प्रास्ताविक केले.सुप्रिया कार्वेकर यांनी सूत्रसंचालन केले.समृद्धी जाधव यांनी आभार मानले.ही कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी कार्यालयीन अधीक्षक एस.के. पाटील,वरिष्ठ लिपिक अनिल इंदुलकर,ग्रंथपाल सुरज इंगळे आणि सेवक तानाजी मोहिते यांनी अथक परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा