*श्रीपूर---ज्येष्ठ पञकार*
*बी.टी.शिवशरण
25 फेब्रुवारी रोजी सोलापूर येथे संविधान सन्मान मेळावा आयोजित करण्यात आला आहे सोलापूर येथील मेळाव्यात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे उपस्थितीत सदर संविधान सन्मान मेळावा होत आहे या मेळाव्याला सोलापूर जिल्हा व पश्चिम महाराष्ट्रातील पदाधिकारी नेते कार्यकर्ते यांची लक्षणीय उपस्थिती असणार आहे या मेळाव्यात आरपीआय आठवले गट प्रदेशाध्यक्ष व पक्षाचा चेहरा म्हणून ओळख असलेले राजाभाऊ सरवदे यांची तोफ धडाडणार आहे त्यामुळे ते काय बोलतात काय भूमिका घेतात याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाची भूमिका काय रहाणार आहे यावर राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांचे निर्णयाकडे राज्यातील पक्ष कार्यकर्ते नेते डोळे ठेवून वाट पाहत आहेत सोलापूर येथे होत असलेल्या मेळाव्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे सोलापूर जिल्ह्याचा स्वाभिमान कार्यकर्त्यांचे प्रेरणास्थान राजाभाऊ सरवदे यांनी रिपब्लिकन पक्ष एकसंध ठेवण्यासाठी जिवाची बाजी लावली आहे पश्चिम महाराष्ट्रात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे मजबूत जाळे निर्माण केले आहे राजाभाऊ सरवदे हे सतत आक्रमक व आघाडीवर राहिले आहेत त्यामुळे पक्ष कार्यकर्त्यांत उत्साह चैतन्य सळसळते रक्त वहात आहे असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही राजाभाऊ सरवदे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे धोरण नियोजन कार्यक्रम हे अतिशय सुलभ नियोजनबद्ध होत असते शिस्त प्रामाणिकपणा यामुळे या मेळाव्याला कार्यकर्त्यांनी गावागावात खेड्यापाड्यात वस्त्या वाड्यावर मेळाव्याला जाण्याची जोरदार तयारी केली आहे पोष्टर निळे झेंडे पक्षाचे फ्लेक्स बनवण्यासाठी जोमाने कामाला सुरुवात केली असल्याचे दिसून येत आहे सोलापूर जिल्हा पुर्ण संविधान सन्मान मेळावामय होणार आहे आगामी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रिय अध्यक्ष प्रदेशाध्यक्ष हे पक्षाची काय भूमिका निर्णय घेतात या कडे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे रिपब्लिकन पक्षाचे प्रदेशाध्यक्ष झाल्या नंतर प्रथमच सोलापूर येथे एवढा मोठा मेळावा आयोजित करण्यात आला आहे पंचवीस फेब्रुवारी रोजी होत असलेल्या मेळाव्यात बाबासाहेबांच्या निळ्या पाखरांचे थवे भीम जल्लोषात सहभागी होणार असल्याने उत्सुकता शिगेला पोहोचली आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा