*टाइम्स 45 न्युज मराठी
*मो.9730 867 448
सांगोला तालुका उच्च शिक्षण मंडळ संचलित,सांगोला महाविद्यालयात बुधवार दिनांक28/02/2024रोजी राष्ट्रीय विज्ञान दिन संपन्न झाला. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून शंकरराव मोहिते महाविद्यालय अकलुज येथील माजी प्रा. रामलिंग सावळसकर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. सुरेश भोसले होते. राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून विज्ञान मंडळ, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष सांगोला महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये सायन्स प्रोजेक्ट प्रेझेंटेशन,पोस्टर प्रेझेंटेशन,मॉडेल प्रेझेंटेशन, वॉलपेपर प्रेझेंटेशन व रांगोळी प्रेझेंटेशन यासर्व स्पर्धेचे आयोजन केले होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा. प्रा. रामलिंग सावळकर सर यांच्या हस्ते विज्ञानप्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. विज्ञान प्रदर्शना मध्ये क्रमांक मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा सर्टिफिकेट देऊन सत्कार करण्यात आला.
राष्ट्रीय विज्ञान दिन कार्यक्रमाची सुरुवात सर डॉ. चंद्रशेखर व्यंकट रमण यांच्या प्रतिमेचे पूजन पाहुण्यांच्या हस्ते करून झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विज्ञान विभागाचे प्रमुख डॉ. रमेश बुगड यांनी केले तर पाहुण्यांचा परिचय तर डॉ.राम पवार यांनी केला.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे यांनी "वैज्ञानिकांच्या नवल कथा"या विषयावर व्याख्यान दिले. आपल्या भाषणामध्ये त्यांनी वैज्ञानिकांच्या जीवनगाथा कथन केल्या. ते म्हणाले की, वैज्ञानिक हे सहजासहजी निर्माण झाले नाहीत. त्यांना अनेक संकटे आली. काहींना तर आपली सर्व संपत्ती गमवावी लागली. काहींना आपल्या प्राणास मुकावे लागेले तर काहींना तुरुंगवास भोगावा लागला. परंतु वैज्ञानिक किंचितही डगमगले नाहीत व त्यांनी आपले संशोधन अविरत चालू ठेवणे आणि त्यांच्या मुळे सध्या आपले जीवन सुलभ व सुखकर झाले आहे.
आपल्या अध्यक्षीय भाषणा मध्ये महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. सुरेश भोसले यांनी विज्ञान दिना विषयी माहिती सांगितली. विद्यार्थ्यांना विज्ञानाच्या क्षेत्रात कामगिरी केलेल्या शास्त्रज्ञांची नावे, योगदान याची जाणीव व्हावी यादृष्टीने स्पर्धा घ्याव्यात असे आवाहन केले
विज्ञान दिना निमित्त कु. अनुजा पाटील, कु. आकांक्षा तेली (बी.एस्सी.१), कु. श्रुती खांडेकर (बी.एस्सी.२), संकेतसुडके (बी.एस्सी.३) या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले, तर प्राध्यापक मनोगत भौतिकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. टी. आर. माने यांनी केले. आपल्या मनोगतात सर सी. व्ही. रामन यांचे संशोधन कार्य विद्यार्थ्यांना सांगितले. विद्यार्थ्यांनी त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून संशोधन कार्य करावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. विज्ञान प्रदर्शन यशस्वी होण्यासाठी शास्त्र शाखेतील प्राध्यापक डॉ. प्रकाश बनसोडे, डॉ.विजय गाडेकर, डॉ.भारत पवार व डॉ.रेणुकाचार्य खानापुरे, प्रा.कु. पी.एस. गायकवाड, सौ. डी. एच. हुलवान व सौ. डी. यु. कटप. यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील विज्ञान शाखेचे प्राध्यापक डॉ. प्रकाश पाटील व प्रा. ओंकार घाडगे उपस्थित होते. विज्ञान शाखेचे सर्व प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन कु. वैष्णवी माळी यांनी केले व सर्व उपस्थितीचे आभार प्रा. वासुदेव वलेकर यांनी मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा