*ॲड---शीतल चव्हाण*
मो;-9921657 346
(१) ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स च्या करवाया न करण्याची 'गॅरंटी'.
(२) संभाव्य निवडणूकांत भाजपाकडून तिकिटाची 'गॅरंटी' किंवा राज्यसभा, विधानपरिषद, महामंडळे या ठिकाणी 'एंट्री'ची 'गॅरंटी'.
(३) नेत्यांच्या साखर कारखान्यास भरघोस वित्तपुरवठा करण्याची 'गॅरंटी' किंवा पक्षांतरानंतर अशा कारखान्यांवर पक्षांतर करणाऱ्या नेत्यांचाच एकहाती (लोकशाहीप्रणालीनुसार नव्हे) कारभार चालू देण्याची 'गॅरंटी' किंवा सहकारी साखर कारखाने, शिक्षण संस्था, सहकारी बॅंका, पतसंस्था इत्यादी ठिकाणी पक्षांतर करणाऱ्या नेत्यांनी एकहाती कारभार ठेवून केलेल्या घोटाळ्यांची चौकशी न लावण्याची 'गॅरंटी'.
(४) मतदारसंघाला भरघोस निधी आणि त्या निधीतून भरघोस टक्केवारीच्या माध्यमातून मोक्कार पैसा कमावण्यास मुभा देण्याची 'गॅरंटी'.
(५) आधी केलेल्या भ्रष्टाचारांच्या प्रकरणांची चौकशी न लावता 'क्लिन चिट' देण्याची 'गॅरंटी'
टी.व्ही. चॅनल्सवर जी 'मोदी की गॅरंटी' दाखवली जात आहे, ती सब झूठ आहे, जुमला आहे. खरी 'गॅरंटी' ही वरिलप्रमाणे विरोधी पक्षातील नेत्यांना भाजपा व मित्र पक्षात घेण्यासाठी दिली जात आहे.
© ॲड. शीतल शामराव चव्हाण
(मो.9921657346)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा