*अकलुज ----प्रतिनिधी*
*केदार लोहकरे*
*टाइम्स 45 न्युज मराठी
पांचाळ सोनार समाज संघटना अकलूज यांच्यावतीने संत शिरोमणी नरहरी महाराज यांची ७३८ पुण्यतिथी विविध धार्मिक विधीने उत्साहात,भक्तीभावाने साजरी करण्यात आली.
अकलूज येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात संत शिरोमणी नरहरी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्ताने पहाटेची महापूजा समाजाचे धवलसिंह पंडित व प्रियांका पंडित या उभयंताच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणी मातेला अभिषेक घालून संत नरहरी महाराज यांच्या प्रतिमेचे विधी पूजन करून महाआरती करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी अकलूज ग्रामपंचायतीचे माजी सरपंच किशोरसिंह माने-पाटील उपस्थित होते.सकाळी ९ ते १२ वाजेपर्यंत रंगनाथ पोतदार व त्यांचे सहकारी आणी रुक्मिणी विठ्ठल महिला भजनी मंडळाचे भजन होऊन संत शिरोमणी नरहरी महाराज यांच्या प्रतिमेवर पुष्पवृष्टी करण्यात आली.
याप्रसंगी अकलूज पांचाळ सोनार समाज संघटनेचे पदाधिकारी व महिला मंडळ यांच्यासह समाज बांधव भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.सर्व धार्मिक कार्यक्रमाचे पौराहित्य सनद महामुनी यांनी यांनी केले.याप्रसंगी उपस्थितांना समाज बांधव भगिनी यांना महाप्रसादाचा देण्यात आला.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समाजाचे अध्यक्ष राजीव लोहकरे,उपाध्यक्ष सुभाष पोतदार,खजिनदार हर्षद लोहकरे,सचिव प्रकाश कामेगांवकर,कार्याध्यक्ष बालाजी दिक्षीत,सदस्य रंगनाथ पोतदार, अनिल पोतदार,संजय पोतदार, अरुण क्षिरसागर,बाळासाहेब वेदपाठक,अमित लोहकरे,रविंद्र भास्करे,निरंजन पंडित,सोमनाथ जडे,आकाश तुळजापूरकर,नागेश वेदपाठक,महिला प्रतिनिधी अनुराधा लोहकरे,सविता क्षिरसागर यांच्यासह समाज बांधव भगिनींनी परिश्रम घेतले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा