निमगाव -----प्रतिनिधी
रामचंन्द्र मगर
टाइम्स 45 न्युज मराठी
महाराष्ट्र शासनाच्या स्व. यशवंतराव चव्हाण वाङ्मय पुरस्कारातील चरित्रासाठी दिला जाणारा साहित्यसम्राट न.चिं. केळकर पुरस्कार निमगाव म माळशिरस येथील डॉ. राजेंद्र सर्जेराव मगर लिखित मुद्रण महर्षी दामोदर सावळाराम यंदे चरित्रास शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला एक लाख रुपये रोख स्मृतिचिन्ह व मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे
कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी मुख्यमंञी एकनाथराव शिंदे होते
दि. २७ फेब्रुवारी रोजी यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे आयोजित केलेल्या मराठी राजभाषा दिनाच्या सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शालेय शिक्षणमंत्री तथा मराठी भाषा विभागाचे मंत्री दीपक केसरकर, महाराष्ट्र साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष सदानंद मोरे, विश्वकोष मंडळाचे अध्यक्ष राजा दीक्षित आणि मराठी भाषा विभागाच्या सचिव मनीषा पाटणकर-म्हैसकर उपस्थित होते.
या प्रसंगी मुख्यमंत्र्यांनी पुरस्कारार्थीचे मराठी राजभाषेसाठी मोठे योगदान दिल्याचे कबूल केले तर युवकांनी लेखन करत असताना प्रचलित प्रथा मोडीत काढून अनेकानेक प्रांतांत लेखन करावे, त्याबरोबर नवनवीन शोध घेत दुर्मिळ आणि अलक्षित व्यक्तिमत्ताच्या महनीय लोकांचा लेखणीद्वारे परिचय करून द्यावा असे अवाहन केले.
शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी प्रास्ताविकात ग्रामीण भागातील लेखकाचे कौतुक केले विषेश आभार मानले.
डॉ. मगर यांनी महाराजा सयाजीराव गायकवाड चरित्र साधने प्रकाशन समितीमध्ये संशोधन सहायक म्हणून काम करताना अठरा ग्रंथांचे लेखन-संपादन केले आहे. त्यांनी याच प्रकल्पाअंतर्गत मुद्रण महर्षी दामोदर सावळाराम यंदे चरित्र लिहिले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा