Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, १८ मार्च, २०२४

*माढा लोकसभा 2024 च्या पार्श्वभूमीवर --"धैर्यशील मोहिते पाटील "यांची उद्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार) मध्ये होणार "घर वापसी?"*

 


*अमीर मोहोळकर,--अकलुज*

*मो.--9890 299 499


*फलटण च्या रणजितसिंह निंबाळकर यांना भाजपा ने दिलेली "फिर से" उमेदवारी अन् त्यामुळे नाराज झालेले मतदार आणि कार्यकर्त्यांनी प्रतिष्ठेची केलेली हि निवडणूक,याच अनुषंगाने काल दिवसभर अकलूज च्या "शिवरत्न" वर उसळलेला जनसागर कुणाच्याही ऐकण्यात येत नसताना,"शिवरत्न" मध्ये होत असलेली खलबत्यावर बारीक नजर ठेऊन होता,त्यामुळे की काय उद्या कुठ्ल्याही क्षणी धैर्यशिल मोहिते पाटील यांचा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा मध्ये प्रवेश होऊ शकतो,अशी माहिती सुत्रांनी दिली...*



      *शेकाप चे भाई जयंत पाटील,फलटण चे आमदार दिपक चव्हाण,मा रामराजे निंबाळकर,रघुनाथ राजे निंबाळकर,करमाळा चे मा आमदार नारायण आबा पाटील,टेंभुर्णी चे संजय कोकाटे आणि माढा लोकसभा मतदार संघातून नाराज होऊन झालेले अनेक नेते मंडळी,कार्यकर्ते यांनी काल दिवसभर अकलूज च्या "शिवरत्न" वर ठीया मांडल्यानंतर उद्या कसल्याही परिस्थितीत शरद पवारांच्या पक्षामध्ये जाहीर प्रवेश करून लोकसभेचे उमेदवारी मिळवण्याचा घाट मोहिते पाटील यांच्या अनेक कार्यकर्त्यांनी बोलून दाखविला होता...*



     *गेली दहा वर्षे केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपा ला सोलापूर लोकसभेसाठी उमेदवार मिळेना,हि किती नामुष्की वेळ भाजपा वर आली,असे हि जनतेतून ऐकण्यास मिळत आहे...*

     *भाजपा चे संकटमोचक गिरीश महाजन यांची झालेली दमछाक पाहता ते हि आता माढा लोकसभा मतदार संघासह पश्चिम महाराष्ट्रातल्या बारामती,सांगली, सातारा,सोलापूर येथील मतदार संघातील जनतेच्या अपेक्षा भाजपा कसा पुर्ण करणार या कडे सर्वांचे लक्ष लागले असुन,त्यामुळे उद्या जर धैर्यशिल मोहिते पाटील यांनी "तुतारी" वाजवत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा मध्ये प्रवेश केला तर वावगे ठरू नये,अशी हि चर्चा जनतेतून ऐकण्यास मिळत आहे...*

      *नाव न सांगण्याच्या अटीवर एक कार्यकर्ता असेही म्हणाला की "आगे आगे देखो होता है क्या"...?*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा