*अकलुज ----प्रतिनिधी*
*केदार ---लोहकरे
*टाइम्स 45 न्युज मराठी
अकलूज येथील सहकार महर्षी मोहिते-पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या पदवी व पदविका सिव्हिल इंजिनियरिंग विभागातील विद्यार्थ्यांनी एकदिवशी कुर्डूवाडी रेल्वे स्थानकाला भेट दिली.ही औद्योगिक भेट महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.प्रवीण ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली अशी माहिती सिव्हिल विभाग प्रमुख प्रा.सागर फुले यांनी दिली.
या औद्योगिक भेटीमध्ये विद्यार्थ्यांना रेल्वे स्थानकाविषयी कुर्डूवाडी रेल्वे स्थानकाचे ज्युनियर इंजिनियर अभिषेक कुमार व दादा म्हस्के यांनी मार्गदर्शन केले.त्यामध्ये त्यांनी विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारचे रेल्वे ट्रॅक मध्ये वापरले जाणारे स्लीपर जसे की काँक्रिट स्लीपर, वुडण स्लीपर व वेगवेगळ्या प्रकारच्या रेल्स डबल हेडेड रेल, फ्लॅट फुटेड रेल त्यांचे फायदे व उद्दिष्ट यांविषयी मार्गदर्शन केले.
त्याच बरोबर त्यांनी इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग सिस्टीमविषयी माहिती दिली.त्यामध्ये ते म्हणाले
इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग (EI) ही एक सिग्नलिंग प्रणाली आहे जी भारतीय रेल्वेमध्ये रेल्वेच्या हालचाली नियंत्रित करण्यासाठी वापरली जाते.ही एक संगणक- आधारित प्रणाली आहे जी सिग्नल,पॉइंट्स आणि लेव्हल क्रॉसिंग गेट्स नियंत्रित करण्यासाठी सॉफ्टवेअर वापरते. EI एका विशिष्ट क्षेत्रातील सर्व सिग्नल, पॉइंट आणि लेव्हल क्रॉसिंग गेट्सचे निरीक्षण करण्यासाठी केंद्रीय संगणक वापरून कार्य करते.गाड्या एकमेकांना धडकू शकत नाहीत याची खात्री करण्यासाठी संगणक ही माहिती वापरली जाते. भारतीय रेल्वेमध्ये इलेक्ट्रॉनिक सिग्नलिंग प्रणाली वापरण्याचे काही फायदे येथे आहेत. वाढलेली सुरक्षितता,इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगमुळे सिग्नल अयोग्य क्रमाने बदलले जाणार नाहीत. याची खात्री करून ट्रेनची टक्कर टाळण्यास मदत होते.सुधारित कार्यक्षमता इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग सिग्नल बिघाडामुळे होणारा विलंब कमी करून ट्रेन ऑपरेशन्सची कार्यक्षमता सुधारण्यास मदत करू शकत.
शेवटी प्रा.वैभव रिसवडकर यांनी महाविद्यालयाचे अध्यक्ष, संचालक,सचिव,प्राचार्य,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांच्या वतीने दादा म्हस्के व अभिषेक कुमार यांचे आभार मानले.सदर भेट यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी समन्वयक म्हणून प्रा.वैभव रिसवडकर व प्रा.आरती डांगरे यांनी काम पाहिले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा