*आमीर ---मोहोळकर*
*अकलुज*
*मो.9890 299 499
*जसजशी वातावरणात उन्हाची तीव्रता वाढत आहे तसतशी लोकसभेच्या निवडणुकीचे वारे हि जोरात वाहत असून,गेल्याच आठवड्यात निवडणुक आयोगाने दिलेल्या कार्यक्रमानुसार सबंध भारतामध्ये राजकीय वातावरण देखील तापत असून जिकडे तिकडे चोहीकडे फक्त राजकीय चर्चेचे "उधाण" येत आहे...*
*भाजपा ने दिलेल्या अब की बार 400 पार या आरोळीला महाराष्ट्रातल्या सांगली,सोलापूर,सातारा आणि माढा लोकसभा मतदार संघात तरी दणका बसू शकतो अशी परिस्थिती निर्माण होत असुन,भाजपा ने केलेल्या तिकिट वाटपात सावळा गोंधळ झाल्याची चर्चा हि जनतेतून ऐकण्यास मिळत आहे...*
*भाजपा ने आत्ता पर्यंत केलेल्या तिकिट वाटपामुळे बहुतांश जागी गोंधळ निर्माण झाला असुन त्यामध्ये प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्रातल्या माढा लोकसभा मतदार संघात बंडाळी होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत,2009 साली अस्तित्त्वात आलेला माढा लोकसभा मतदार संघ हा कायम चर्चेचा विषय ठरत असतो,या लोकसभा मतदार संघात मोहिते पाटील यांचे प्राबल्य जास्त असुन तरी सुद्धा भाजपा ने येथे फलटण च्या रणजीत सिंह निंबाळकर यांना फिर से उमेदवारी देत एकच गोंधळ निर्माण केला असुन त्यामुळे इच्छुक असलेल्या मोहिते पाटील गटाची नाराजी भाजपा ला महागात पडण्याची शक्यता दिसुन येत आहे, हे कोडे भाजपा कसे सोडवतो या कडे संपुर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे...*
*तर गेली दहा वर्षे केंद्रात सत्तेत असणाऱ्या भाजपा ला सोलापूर लोकसभेसाठी उमेदवार मिळणे मुश्कील झाले आहे,याच्या विपरीत परिस्थिती सांगली आणि सातारा लोकसभेचे नसुन सातारा लोकसभा मतदार संघातून छत्रपती उदयनराजे भोसले यांचे कार्यकर्ते सुद्धा भाजपा वर नाराज असल्याचे सोशल मीडिया द्वारे दिसत आहे,या पैकी काही कार्यकर्त्यानी तर भाजपा चे राजीनामे दिले आहेत असे बोलले जात आहे...*
*त्यामुळेच की काय अब की बार 400 पार हे भाजपा ने दिलेली आरोळी फुसकी ठरण्याची चिन्हे दिसू लागली आहेत...*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा