Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, २६ मार्च, २०२४

*लोकसभेचे तिकीट आपल्याच घरात राहावे म्हणून-- 62 व्या वर्षी त्यांनी लग्न करून पत्नीला मिळवली "उमेदवारी"*

 


*टाइम्स 45 न्युज मराठी*

 *मो.9730 867 448


देशभरात सध्या प्रत्येक पक्ष निवडणुकीची गणितं लक्षात घेऊन उमेदवार निश्चित करत आहेत. पक्षाकडून उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुक उमेदवार अक्षरशः जिवाचं रान करत आहेत. अशातच बिहारमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

बिहारचे बाहुबली अशी ओळख असलेल्या अशोक महतो यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी वयाच्या 62 वर्षी लग्न केलं आहे. आरजेडीनं त्यांच्या पत्नीला लगेच लोकसभेसाठी तिकीट दिल्याची चर्चा आहे.

लखीसरायचे रहिवासी असलेले अशोक महतो आता तुरुंगाबाहेर आहेत. गेली 17 वर्षे ते तुरुंगात शिक्षा भोगत होते. गेल्या वर्षी ते तुरुंगातून सुटले आहेत. 'खाकी : द बिहार चॅप्टर' ही वेबसीरिज अशोक महतो यांच्या शेखपुरा आणि नवादामध्ये असलेल्या दहशतीवर आधारित आहे. ते एकदा तुरुंगातून पळूनसुद्धा गेले होते. 2006पासून ते जेलमध्ये होते. अशोक महतो यांनी मंगळवारी (19 मार्च) बख्तियारपूरमध्ये 46 वर्षांच्या कुमारी अनिताशी विवाह केला आहे. विवाहानंतर अशोक महतो आणि अनिता यांनी लगेच आरजेडी प्रमुख लालूप्रसाद यादव आणि राबडीदेवी यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. त्यांनी विवाह करण्यामागे मुंगेर लोकसभा मतदारसंघातलं आरजेडीचं तिकीट हे कारण असल्याचं बोललं जातं. ते निवडणूक लढवू शकत नसल्याने त्यांच्या पत्नीला तिकीट देण्यात आल्याची चर्चा आहे. त्यांची पत्नी अनिता जेडीयूचे विद्यमान खासदार राजीव रंजन उर्फ ललन सिंह यांच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. अशोक महतो यांच्याकडे आरजेडी ओबीसी चेहरा म्हणून पाहत आहे; पण ते दलित असल्याचा आरोप बऱ्याच वेळा खुद्द आरजेडीनं केला आहे.

अशोक महतो यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. मन्नीपूर प्रकरणात अशोक महतो यांना शेखपुराचे तत्कालीन एसपी अमित लोढा यांनी अटक केली होती. अशोक महतो यांना 2001मध्ये तुरुंगातून पळून गेल्याच्या आरोपाखाली दोषी ठरवलं गेलं, तर एका हत्या प्रकरणात त्यांची निर्दोष मुक्तता झाली.

आरजेडी लोकसभा निवडणुकीसाठी नितीश यादव यांच्या लव-कुश व्होट बँकेला रोखण्यासोबत आपली एमवाय (मुस्लिम-यादव) ही प्रतिमा पुसून टाकण्यासाठी किमान पाच ते सहा कोइरी-कुरमी ओबीसी उमेदवारांना रिंगणात उतरवण्याचा विचार करत आहे. नवादाचे रहिवासी असलेले महतो हे कुर्मी आहेत. 'दीर्घ काळ तुरुंगात राहिल्याने मी भाषण करणं विसरलो आहे,' असं अशोक महतो यांनी सांगितलं. त्यांनी नितीश कुमार यांच्यावर जोरदार टीका केली. जेडीयूचे एमएलसी आणि प्रवक्ते नीरज कुमार यांनी `द इंडियन एक्सप्रेस`ला सांगितलं की, राजदने अधिकृत उमेदवारांची घोषणा केलेली नसल्यानं त्यावर बोलणं योग्य नाही. पण जर महतो यांच्या पत्नीला तिकीट दिलं गेलं तर त्यातून आरजेडीची मानसिकता स्पष्ट दिसते.

आरजेडीचे प्रवक्ता मृत्युंजय तिवारी म्हणाले, की आम्ही अद्याप लोकसभा उमेदवारांची घोषणा केलेली नाही; पण नैतिकतेचा विचार केल्यास जेडीयूनं आमच्यावर टीका करण्यापूर्वी स्वतःच्या काही उमेदवारांचा इतिहास पाहावा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा