इंदापूर तालुका......प्रतिनिधी
एस. बी. तांबोळी मोबाईल 8378081147
:---जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर शेती केली जाते. निसर्गाने नटलेल्या, डोंगर दरीत तसेच नदी नाले असलेल्या या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर शेती केली जात आहे. अस असताना जिल्ह्यात खसखसच्या नावाखाली अफूची शेती केली जातं असल्याचं उघडकीस आलं असून पुणे ग्रामीण पोलिसांकडून 1 फेब्रुवारी पासून ते आत्ता पर्यंत 8 ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे.
आत्ता जी कारवाई करण्यात आली आहे ती दौंडला करण्यात आली आहे. यात 416 किलो अफू जप्त करण्यात आलं आहे. आर्धां एकर जागेत अफूची शेती केली जात होती. आत्ता पर्यंत ज्या आठ ठिकाणी कारवाई करण्यात आली आहे त्यात घोडेगाव, शिक्रापूर, सासवड, जेजुरी, भिगवन, यवत आणि हवेली अशा ठिकाणी अफूची शेती ही केली जातं होती आणि तिथं जाऊन पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे. आत्ता पर्यंत 751 किलो अफू जप्त करण्यात आलं आहे.
अफूची शेती ही बेकायदेशीर असून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आवाहन आहे की अफूची शेती ही करू नये काही शेतकरी हे खसखस च्या नावाखाली अफूची शेती करतात.हे सर्व बेकायदेशीर असून अशा पद्धतीने जर कोणी खसखस च्या नावाखाली अफूची शेती करत असेल तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.चार पैसे जास्त मिळत आहे म्हणून कोणीही या गुन्हेगारी शेतीकडे वळू नये अस आवाहन पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी केलं आहे
कांदा, लसूण तसेच इतर पिकांमध्ये अफूची लागवड केल्याचे समोर आलं आहे. काही दिवसांपूर्वी पुणे पोलिसांनी आंतरराष्ट्रीय ड्रग्ज प्रकरण उघडकीस केलं होत.एकीकडे पुणे पोलिसांना ड्रग्स प्रकरण उघडकीस आणलं आहे तर दुसरीकडे ग्रामीण पोलिसांकडून अफू तसेच गांजाची लागवड करण्यात येत असल्याचे वेळोवेळी दिसून आले आहे. शेतीच्या आड हा गोरख धंदा करण्यात येत असून लसून, कांदा अशा शेतीत त्याची लागवड होत आहे.
शेतकऱ्यांसाठी बांबू शेती प्रशिक्षण शिबीर
पुण्याच्या भोर तालुक्यातील दुर्गम हिरडस मावळ खोऱ्यात शेतकऱ्यांसाठी, शासनाच्या कृषी विभागातर्फे एक दिवसीय बांबू शेती प्रशिक्षण शिबीर घेण्यात आलं. यामध्ये बांबूची शाखीय पद्धतीने रोपवाटिका उभारणी करण्याविषयी तज्ञांकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आलं. त्याचबरोबर रोप कसे लावावे आणि रोपं लावताना कोणती काळजी घ्यावी याचं प्रात्यक्षिक दाखवत विविध विषयांवर तज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात आलं. बांबू लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याला 100 रोपे दिली जाणारेयत. या एक दिवसीय शेतकरी प्रशिक्षणासाठी शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.



 
 

 
 
 
 
 
 
 
 
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा