*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448
निमगाव (मगराचे)येथील शेतकरी ,आणि ग्रामस्थांनी कालव्याच्या कामातील भ्रष्टाचाराची चौकशी करून काम पूर्ण करावे आणि तात्काळ पाणी सोडावे अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आलीअसुन
याप्रसंगी निमगाव येथील शेतकरी डॉ. गोरख मगर विकास मगर ,अशोक तात्या मगर, पत्रकार रामभाऊ मगर, अमर माने पाटील ,गोपाळ काटकर, शंकर काटकर, अशोक मगर ,धनाजी शिंदे, राहुल मगर, सुखदेव कदम ,विठ्ठल मगर, कालिदास मगर, उमेश मगर, नितीन मगर ,भारत मगर ,शंकर मगर ,बाळासाहेब लोखंडे ,ग्रामस्थ शेतकरी उपस्थित होते
हे निवेदन माळशिरस चे तहसीलदार शेजाळे साहेब यांनी निवेदन स्वीकारून जिल्हाधिकारी सोलापूर यांच्याशी चर्चा करून सबंधित कालव्याची अधिकारी प्रतिनिधी यांना बोलावून बैठक घेऊन निर्णय मार्गी लावू असे आश्वासन तुकाराम साळुंखे पाटील यांना तहसीलदार माळशिरस यांनीदिले
तसेच लवकरात लवकर या निवेदनाचा निर्णय घ्यावा अन्यथा ...शेतकऱ्यांवर उपोषणास बसण्याची वेळ आणू नये अशी विनंती करण्यात आली संबंधित एन आर बी सी चे अधिकारी यांना माळशिरस चे तहसीलदार यांनी ताबडतोब फोन लावून लेखी सद्यस्थिती सुचवावी अशी सूचना देण्यात आली शेतकरी उपोषणास कालव्याचे काम पूर्ण व्हावे पाणी सोडावे कालव्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असून कामात भ्रष्टाचार झाला आहे यासाठी उपोषणास उद्यापासून बसणार होते माञ माळशिरस चे तहसीलदार व राष्ट्रवादी काँग्रेस चे माढा लोकसभेचे इच्छुक उमेदवार तुकाराम साळुंखे पाटील यांच्या मध्यस्थीने उपोषणास बसण्याची वेळ येणार नाही अशी ग्वाही देण्यात आली
एम आय टॅंक वरील कालव्याच्या कामाची पाहणी करणार असेही तुकाराम साळुंखे पाटीला यांनी शेतकऱ्यासमोर बोलताना सांगितले आपले प्रश्न शरदचंद्र पवार यांना निवेदन सादर करण्यात येत आहे यापूर्वी शेतकरी ने मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री, जल संपदा मंत्री, पालकमंत्री , माढा लोकसभा खासदार , माळशिरस विधानसभा आमदार सोलापूर जिल्हाधिकारी, निरा उजवा कालवा ,वेळापूर पोलीस स्टेशन, ग्रामपंचायत निमगाव सरपंच यांनाही निवेदन सादर केलेले आहेत
तरी निरा उजवा कालवा फलटण यांनी तातडीने एम.आय.टँक निमगाव कालव्याच्या कामाकडे लक्ष द्यावे अन्यथा...उपोषणास बसणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरद पवार सामाजिक न्याय विभागाचे संघटक सचिव महाराष्ट्र राज्य. तुकाराम साळुँके पाटील यांनी शेवटी इशारा दिला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा