*विशेष----प्रतिनिधी*
*राजु (कासिम)मुलाणी*
*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.-84088 17333
दिनांक 18 मार्च 2024 रोजी अकलूज नगरपरिषद हद्दीतील शंकरराव मोहिते प्रशाला, माळेवडी व नॉलेज सिटी, शंकरनगर व आज दिनांक 19 मार्च 2024 रोजी रत्नाई कृषी महाविद्यालय आनंदनगर - अकलूज येथे *मतदार जनजागृती अभियान* राबविण्यात आले.त्यामध्ये SVEEP नोडल अधिकारी म्हणून अकलूज नगरपरिषद मुख्याधिकारी दयानंद गोरे साहेब , नगर अभियंता राम भगनुरे समन्वय शिक्षक सुहास उरवणे, कन्हेरे सर, प्रशाला शिक्षक वर्ग व नगर परिषद कर्मचारी उपस्थित होते.
मुख्याधिकारी गोरे साहेब म्हणाले की, ज्या विद्यार्थी ,विद्यार्थिनी यांचे वय वर्ष १८ सुरू आहे व ज्यांनी अद्यापही आपले नाव मतदार यादीत नोंदणी केलेले नाही त्यांनी ताबडतोब आपले नाव नवीन मतदार नोंदणी फॉर्म क्रमांक ६ भरून नोंदणी करावी.तसेच जे नव मतदार प्रथमच आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.त्यांनी मतदान करण्यास गेल्यानंतर इलेक्ट्रॉनिक वस्तू जसे मोबाईल फोन आत घेऊन जाऊ नये व मतदान करताना गुप्तता पाळावी.कोणीही धर्म जात नातेवाईक किंवा अन्य कोणत्याही प्रलोभन,दबाव किंवा अमिषाला बळी न पडता आपला पवित्र असा मतदानाचा हक्क बजवावा.आपल्या भारत देशाच्या विकासाला बळकटी देण्यासाठी सक्षम अश्या उमेदवाराची योग्य निवड करावी असे आवाहन करून मतदार शपथ सर्वांना देण्यात आली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा