Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, १२ मार्च, २०२४

*लेखक -- इंद्रजीत पाटील "छत्रपती -संभाजी महाराज" राज्यस्तरीय साहित्यरत्न पुरस्काराने सन्मानित*

 


*टाइम्स 45 न्युज मराठी*

*मो. 9730 867 448

                 - दि. ११ मार्च २०२४,वार - सोमवार राेजी १५ वे छत्रपती संभाजी महाराज राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलनाचे आैचित्य साधून लेखक इंद्रजित पाटील यांना छत्रपती संभाजी महाराज राज्यस्तरीय साहित्यरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.हे संमेलन अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेने आयोजित केले हाेते.यावेळी अ.भा.म.साहित्य परिषद,राष्ट्रीय अध्यक्ष मा.श्री.शरद गाेरे हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.संमेलनाचे अध्यक्ष म्हणून सुप्रसिद्ध साहित्यिक मा.डाॅ.कृष्णा इंगाेले,उदघाटक म्हणून सुप्रसिद्ध शाहीर मा.रमेश खाडे,प्रमुख संयाेजक मा.फुलचंद नागटिळक,राष्ट्रीय खजिनदार अ.भा.म.सा.प,मा.श्री.पंडितराव लाेहाेकरे,जिल्हाध्यक्ष अ.भा.म.सा.प,साेलापूर, मा.श्री.सुहास ( काका) जामगावकर पाटील उपाध्यक्ष अ.भा.म.सा.प,साेलापूर, ज्येष्ठ साहित्यिक मा.श्री.देवेंद्र आैटी,रामप्रभू माने,प्रकाश गव्हाणे, अनिल गव्हाणे,हेमंत रत्नपारखी यांची प्रमुख उपस्थिती हाेती. 

       हे संमेलन शिवस्मारक नाट्यगृह,साेलापूर याठिकाणी अगदी थाटामाटात संपन्न झाले. कविसंमेलनात साहित्यिक इंद्रजित पाटील यांनी सादर केलेल्या शंभूराजांच्या अभंगाने रसिक श्रोत्यांची मने जिंकली.

         साहित्य क्षेत्रातील लेखक इंद्रजित पाटील यांची गरूडझेप पाहून चंद्रकांत पाटील,भागवत उकिरंडे,रावसाहेब पाटील,संजय भड,अमाेल देशमुख,राकेश गरड यांनी विशेष अभिनंदन केले व पुढील साहित्यिक वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.


टाइम्स 45 न्युज मराठीच्या वतीने 

हर्दिक हर्दिक शुभेच्छा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा