*माळशिरस तालुका ---प्रतिनिधी*
*रशिदभाई शेख.*
*टाइम्स 45 न्युज मराठी.
माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री महालक्ष्मी देवीच्या यात्रेची बक्षीस वितरण समारंभ व श्रीमहालक्ष्मी देवीचा भव्य छबिना काढून व विविध प्रकारचे कार्यक्रम राबवून यात्रेची सांगता करण्यात आली
बक्षीस समारंभ लोकनेते उत्तमराव जानकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला यावेळी शिवसेनेचे प्रवक्ते प्रा लक्ष्मण हाके सांगोल्याचे डॉ बाबासाहेब देशमुख भाजपाचे पांडुरंग वाघमोडे माजी जिल्हा परिषद सदस्य गणेश पाटील सरपंच महावीर धायगुडे, भुजंगराव शिंगाडे जयवंत सूळ संग्राम पाटील वीजवितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता प्रदीप थोरात पंचायत समितीचे कृषी विस्तार अधिकारी अनिल सावळजकर ग्रामविकास अधिकारी विलास बाबर डॉ शे़डगे, चेअरमन बाबासाहेब पाटील व्हा चेअरमन निशांत बगाडे संचालक बाबुराव पाटील अमोल मदने पाटील आनंद पाटील शिवाजी पिसे लहू पाटील सतीश मदने नितीन कपने प्रा संजय पाटील अतुल नष्टे दामोदर लोखंडे प्रमोद भैस शाहरुख मुलाणी आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी प्रास्ताविकात गणेश पाटील यांनी यात्रेचा कार्यक्रमाचा संपूर्ण वृत्तांत सांगून यात्रा काळात जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या मार्गदर्शनाखाली प्रांताधिकारी श्रीमती विजया पांगारकर तहसीलदार सुरेश शेजुळ गटविकास अधिकारी विनायक गुळवे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय मोहिते हवालदार पंडित मिसाळ धनाजी झगडे पोलीस कर्मचारी तसेच राजेवाडी कारखाना ,चांदापुरी कारखाना , अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते पाटील संचालक बाबुराव कदम उत्तमराव जानकर सचिव,पंचायत समिती च्या वतीने पिण्याच्या पाण्यासाठी टँकर ची सोय करण्यात आली होती.एम एस इ. बी ,वीज वितरण कंपनी जनावराचे डॉक्टर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी यांचा स्टाफ एस.टी महामंडळ पोलीस खाते श्रीमहालक्ष्मी देवीचे पुजारी शे़डगे वगरे मदने तसेच श्री महालक्ष्मी देवी परिसरातील इनामदार व तंदर मानकरी व्यापारी दुकानदारया सर्वांचे सहकार्य लाभलेने चालू वर्षी यात्रेचे सर्व कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडू शकलो यात्रा काळात कुस्त्याचे मैदान देवीची रथातून मिरवणूक देशी व खिलार जनावरांची निवड गजी ढोल स्पर्धा इत्यादी कार्यक्रम यशस्वीरित्या राबवले तसेच देशी व खिलार जनावराच्या खरेदी विक्रीतून मोठी उलाढाल झाली असल्याचे सांगितले यावेळी शेतमालाची निवड करून त्यांना बक्षीस देण्यात आले तसेच गजी ढोल खेळातील विजेत्या स्पर्धकासह भाग घेतलेल्या सर्व गजी ढोल संघाला उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले आहे तसेच देशी व खिलार जनावरे यांच्याही निवड झालेल्या जनावरांना बक्षीस दिले जात आहेत या बक्षिसाचे वितरण लोकनेते उत्तमराव जानकर प्राध्यापक लक्ष्मण हाके डॉक्टर बाबासाहेब देशमुख पांडुरंग वाघमोडे राहुल मदने दादाराजे घाटगे बाबुराव पाटील व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले यावेळी उत्तमराव जानकर प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी आपले यात्रेविषयीचे अनुभव कथन केले सुत्रसंचलन गणेश पाटील यांनी तर आभार प्रदर्शन चेअरमन बाबासाहेब पाटील यांनी व्यक्त केले
फोटो.बक्षीस वितरण करताना उत्तमराव जानकर प्रा लक्ष्मण हाके व इतर मान्यवर डॉ बाबासाहेब देशमुख पांडुरंग वाघमोडे गणेश पाटील बाळासाहेब पाटील निशांत बगाडे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा