*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो. 9730 867 448
तुळजापूर तालुक्यातील बारूळ येथे अध्यापनाची सेवा करत असलेले शिक्षक "अमीन जाहिरोद्दीन मुलाणी" यांना तुळजापूर पंचायत समितीच्या वतीने दिला जाणारा "आदर्श शिक्षक " पुरस्कार तुळजापूर तालुक्याचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या हस्ते 13/03/2024 रोजी प्रदान करून गौरविण्यात आले . कार्यक्रमाचे प्रस्ताविक गटशिक्षणाधिकारी मॅडम यांनी केले..आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी शाळेची गुणवत्ता वाढवून तालुक्याचा नावलौकिक वाढवावा,नवीन संकल्पना मला सुचवाव्या त्यासाठी लागेल ते सहकार्य केले जाईल अशी ग्वाही दिली.
याप्रसंगी तुळजापूरच्या गटशिक्षणाधिकारी . इनामदार मॅडम,सर्व शिक्षण विस्ताराधिकरी,केंद्रप्रमुख , पुरस्कारार्थी शिक्षक, पत्रकार, बिटचे विस्तार अधिकारी .मल्लिनाथ काळे,केंद्राचे केंद्रप्रमुख एस एस .लोखंडे ,शाळेचे मुख्याध्यापक बी.टी.. पवार . डी. एल सारणे,एन एस मोरे . एम आर . राजगुरु , सरपंच शहाजी आण्णा सुपनार, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, ग्रा.पं.सदस्य व इतर मान्यवर बहुसंख्येने उपस्थितीत उपस्थित होते
शेवटी डाॕ.के.वाय.चव्हाण यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा