Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, १४ मार्च, २०२४

*ई.व्ही.एम -ला विरोध बॕलेट पेपर वर मतदान घेण्याची सर्व स्तरातून आग्रही मागणी.*

 


*श्रीपूर ----बी.टी.शिवशरण.

             संपूर्ण देशभरात ईव्हीएम मशीनवर मतदान घेण्यात येऊ नये म्हणून प्रचंड विरोध आहे कोणत्याही परिस्थितीत लोकसभा निवडणूक मतदान मतपत्रिका वर घेऊन मतदारांचा आग्रह मान्य करावा अशी मागणी होत आहे जर ईव्हीएम मशीनवर मतदान घेण्यात मतदारांचा विरोध असेल तर भाजपप्रणीत विद्यमान मावळत्या केंद्र सरकारने बेलेट पेपर वरच मतदान घेण्याची प्रामाणिक भुमिका घेतली पाहिजे अशा प्रतिक्रिया गल्ली पासून दिल्ली पर्यंत असताना केवळ भाजपचाच एवढा अट्टाहास ईव्हीएम वर मतदान घेण्याचा का आहे त्यांना ईव्हीएम शिवाय बेलेट पेपरवर मतदान घेतले तर कशाची भिती वाटते असा साधा सरळ सवाल. देशातील नागरिक विचारत आहेत जगात खंबीर नेतृत्व तसेच विकासाच्या मोठ्या वल्गना गप्पा मारणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील सर्वसामान्यांचा आवाज का ऐकत नाहीत हा मुख्य विषय अनुत्तरित आहे अमुक कामे केली तमुक योजना राबविल्या प्रकल्प कार्यान्वित केले जे केले ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ग्यारंटी आहे अशा माध्यमातून सकाळ संध्याकाळ जाहिरातींचा रतीब घातला जात आहे गेल्या दोन पंचवार्षिक निवडणुका ईव्हीएम मशीनवर मतदान करुन भाजप सत्तेवर आले आहे त्यांच्यात जर त्यांनी केलेल्या विकासकामांची ग्यारंटी आहे तर मग बेलेट पेपरवर मतदान घेऊन पुन्हा सत्तेत येण्याची त्यांना भीती कशाची वाटते असे देशभरात भाजप वगळता अन्य सर्व राजकीय पक्ष मतदार यांचा साधा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा यांना विचारला जात आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा