*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448
शिवसेना
(उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मातोश्री या निवासस्थानी पत्रकार परिषद घेत,
भा.ज.पा. सरकारपासून असलेल्या गंभीर धोक्याची जाणीव करून दिली.
ई.व्ही.एम. घोटाळा करून ते जिंकलेच तर देशात मोठा असंतोष उसळेल,
असा इशारा त्यांनी दिला. तसेच जुमलाचे नामकरण आता गॅरंटी असे केले असावे,
असा सणसणीत टोलाही उद्धव ठाकरे यांनी भा.ज.पा.ला लगावला.
आपण सर्व स्तरातील जनतेला भेटत आहोत. सर्व स्तरातील जनता नाराज आहे.
आपण यात अंधभक्तांना धरत नाही.
त्यांनाडोळे असून दृष्टी नाही,
असेच म्हणावे लागेल. त्यामुळे अंधभक्तांना सोडून द्या.
उद्योगपती, शेतकरी, कामगार सगळ्यांमध्ये असंतोष आहे.
ई.व्ही.एम.ने ते जिंकू शकतात,
असा समज निर्माण केला जात आहे.
ते जिंकणारच आहेत,
असा गैरसमज पसरवला जात आहे.
जर ते ई.व्ही.एम. घोटाळा करून जिंकलेच तर देशात मोठा अंसंतोष निर्माण होईल,
असा इशारा शिवसेना
(उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला.
जनता हा लोकशाहीतील महत्त्वाचा आणि मोठा घटक आहे.
क्रांती ही नेते करत नसून क्रांती जनता करते. जनतेच्या मनाविरुद्ध झाले तर जनता क्रांती करणारच.
त्यांनी चंदीगडमध्येही अशाचप्रकारे जिंकण्याचा प्रयत्न केला.
त्यानंतर आता हिमाचल प्रदेश मध्येही असाच प्रयत्न केला.
मात्र, तोडा, फोडा, तुरुंगात टाका आणि राज्य करा,
हे जास्त काळ टिकणार नाही.
जनतेच्या मनाविरुद्ध ई.व्ही.एम. घोटाळा करून ते जिंकले तर देशात मोठा असंतोष उसळेल.
त्याची आपल्याला चिंता वाटते,
असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.
अशा परिस्थितीत आपण जनतेसोबत आहोत. जनतेला विश्वास देत आपल्यासोबत घेत आहोत.
जनता हेच आपले मोठे भाडंवल आहे,
असेही ते म्हणाले.
भा.ज.पा.ने १९५ जणांची यादी जाहीर केली.
ज्यावेळी आपण मोदी, शहा यांची नावेही ऐकली नव्हती,
त्यावेळेपासून
नितीन गडकरी यांचे नाव ऐकले आहे, त्यांच्यासोबत काम केले आहे.
ते भा.ज.पा.चे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे मुंबई-पुणे महामार्गाचे स्वप्न त्यांनी विक्रमी वेळेत पूर्ण केले आहे.
अशा व्यक्तीचे नाव पहिल्या यादीत नाही. मात्र, बेहिशोबी संपत्ती जमवल्याचा आरोप असणाऱ्या कृपाशंकर सिंह यांचे नाव यादीत आहे,
याचे आश्चर्य वाटते,
हीच आजची भा.ज.पा. आहे,
असा टोलाही त्यांनी लगावला.
गेल्या १० वर्षांत शहरांची नावे बदलण्यात आली, जुन्या योजनांची नावे बदलून त्या योजना त्यांच्या नेत्यांच्या नावाने सुरू करण्यात आल्या. तसेच आता जुमलाचे नाव गॅरंटी असे करण्यात आले असावे,
असा सणसणीत टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.
अशा जुमलेबाज गॅरंटीविरुद्ध जनता उभी ठाकली आहे.
आता जनता मागे हटणार नाही,
असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा