*अकलुज ----प्रतिनिधी*
*केदार लोहकरे*
*टाइम्स 45 न्युज मराठी
सोलापूर जिल्ह्यात यंदाच्या वर्षी पाऊस कमी पडला आहे.त्यामुळे जमिनीतील पाण्याच्या पातळी खालावली आहे.सध्या तीव्र उन्हाळा जाणवू लागला असल्यामुळे नद्या,विहिरी, नाले,ओढे कोरडे पडले आहेत. मार्च,एप्रिल,में, जून हे चार महिने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न नीरा नदीच्या काठावरील लोकांना भेडसावणार आहे.त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असो अथवा जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असो अथवा शेतीच्या पाण्याचा प्रश्न असो गंभीर होत चालला आहे.अकलूज येथील निरा माई नदीचे पात्र फेब्रुवारीमध्येच कोरडे पडल्यामुळे असल्यामुळे गावकऱ्यांना पाण्यासाठी लोकांना दाही दिशा भटकंती करावी लागणार आहे.वरील छायाचित्रात नीरा नदीचे कोरडे ठणठणीत पडलेले पात्र तर दुस-या छायाचित्रात नदीच्या डबक्यात साठलेल्या पाण्यात आपली तहान भागविण्यासाठी धावपळ करीत असलेली शेळ्या व मेंढ्या दिसत आहे.त्यामुळे नदी उशाला व कोरड घशाला अशी अवस्था झाली आहे.(छाया:-संजय लोहकरे,अकलूज)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा