*अकलुज -----प्रतिनिधी*
*केदार ----लोहकरे*
*टाइम्स 45 न्युज मराठी
माळशिरस तालुक्यातील विविध गावांच्या विकासासाठी पर्यटन विकास योजने अंतर्गत माध्यमातून 3 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती आ.राम सातपुते यांनी दिली.
माळशिरस तालुक्यातील पर्यटन विकास योजने अंतर्गत दहिगाव, संगम, तोंडले,बोंडले, आनंदनगर,मारकडवाडी व फोंडशिरस येथील कामांना तीन कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.यामध्ये दहिगाव जैन मंदिर परिसर, पुलावरती नदीवर घाट बांधणे, ओढ्यावर घाट बांधणे,आनंदी गणेश मंदिर परिसर रस्ता करणे, वॉटर पार्क बनवणे आदी सुविधा होणार आहेत.
माळशिरस तालुक्याच्या विविध घटकांच्या विकासासाठी मी काम करत आहे.गेली साडेचार वर्षे काम करत असताना कोट्यवधी रुपयांचा निधी आणून त्या माध्यमातून तालुक्याचा विकास करण्याचे काम केले आहे.त्यामध्ये शिक्षण,आरोग्य, भौतिक सुविधा यासोबतच रस्ते आणि वीज यावर प्रभावी काम करण्याचा मी प्रयत्न करत आहे. तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नेतृत्वात माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व आ.रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या सहकार्याने तालुक्यात मोठ्या प्रमाणात निधी आणत आहे असे मत आ.राम सातपुते यांनी व्यक्त केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा