Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, १७ मार्च, २०२४

*माफी मागा नाही तर.. अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार.* *शिवसेनेची "असीम सरोदे" यांना नोटीस*

 


*टाइम्स 45 न्युज मराठी*

 *मो.9730 867 448

मुंबई:--शिवसेनेचे १२ आमदार ठाकरेंकडे परतणार असल्याचा दावा ॲडव्होकेट असिम सरोदे यांनी केला होता. या प्रकरणी आता शिवसेना शिंदे गटाने आक्रमक भूमिका घेतली असिम सरोदे यांना नोटीस पाठवण्यात आली आहे.

दोन दिवसांत माफी मागा नाहीतर अब्रुनुकसानिचा दावा दाखल करणार असल्याचे म्हटले आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

शिवसेना शिंदे गटाचे १२ आमदार उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत पुन्हा परतणार असल्याचा मोठा दावा प्रसिद्ध वकील असीम सरोदे यांनी केला होता. चंदपूर येथील 'निर्भय बनो' सभेत बोलताना त्यांनी याबाबतचे विधान केले होते. तसेच या आमदारांची यादीही असिम सरोदे यांनी वाचून दाखवली होती.

याप्रकरणी आता शिवसेना शिंदे गटाने आक्रमक भूमिका घेतली असून असिम सरोदे यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. दोन दिवसांत माफी मागा नाहीतर अब्रुनुकसानिचा दावा दाखल करणार, असे या या नोटीसमध्ये म्हटले असून आमदार बालाजी कल्याणकर यांनी हा दावा दाखल केला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा