उपसंपादक - नूरजहाँ शेख
टाइम्स ४५ न्यूज मराठी
नुकताच एमपीएससी परीक्षेचा निकाल जाहीर झाला आणि त्यामध्ये लवंग (ता.माळशिरस) येथील अत्यंत गरीब परिस्थितीवर मात करीत तेजस उर्फ खंडू लक्ष्मण पवळ यांची महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा २०२३-दुय्यम निबंधक श्रेणी-1/मुद्रांक निरीक्षक पदावर महाराष्ट्रात कॅटेगिरीमध्ये प्रथम क्रमांकाने निवड झाली.
तेजस पवळ याचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा लवंग येथे झाले असून त्यांचे माध्यमिक शिक्षण श्री हनुमान विद्यालय २५/४ लवंग येथून पूर्ण केले.त्यांचे उच्च माध्यमिक शिक्षण सदाशिवराव माने विद्यालय अकलूज येथे पूर्ण झाले.त्यानंतर पुढील डिग्रीचे शिक्षण बॅंकेतून पर्सनल लोन काढून स्वेरी कॉलेज ऑफ इंजीनिअरिंग,पंढरपूर येथून बीई मॅकॅनिकल ही पदवी प्राप्त केली. GATE परीक्षा पास होऊन आर.आय.टी इस्लामपूर, जि.सांगली येथून एम.टेकचे शिक्षण पूर्ण केले.
शिक्षण पूर्ण झाल्यावर एस.बी.पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग इंदापूर येथे आठ वर्षे प्राध्यापक म्हणून नोकरी केली परंतु खाजगी नोकरी न करता सरकारी लाल दिव्याच्या गाडीत बसण्याचे स्वप्न उराशी बाळगून प्राध्यापक पदाच्या नोकरीला रामराम ठोकत, वयाच्या 31 व्या वर्षी प्रा.तेजस पवळ निघाले स्पर्धा परीक्षेच्या सागरात...कष्टाची नाव घेऊन, सरकारी नोकरीचा किनारा शोधायला...आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची,वडिलांचा लाकडाचा छोटासा व्यवसाय व आई गृहिणी प्रा.तेजस पवळ यांचे लग्न झाले,एक लहान गोंडस मुलगी त्याच बरोबर आईवडिलांची जबाबदारी या सगळ्या कौटुंबिक आर्थिक परिस्थितीला सोबत घेऊन प्रा.पवळ करत होते स्पर्धा परीक्षेची जीवघेणी संयमी स्पर्धा....
नोकरी सोडल्यानंतर त्यांच्या पत्नी त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभ्या राहिल्या. त्यांच्या पत्नीने मुलांचे क्लासेस घेऊन घरची जबाबदारी सांभाळली.आणि प्रा.तेजस पवळ यांनी स्वतःला स्पर्धा परीक्षेच्या दुनियेत पूर्णपणे झोकून दिले.
स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना त्यांना यशवंतिका व अनंत अभ्यासिका मार्गदर्शन केंद्र,इंदापूर येथील सहकाऱ्यांचे मार्गदर्शन भेटले.त्याच काळात त्यांचे सहकारी मिञ संग्राम कुबेर यांची मोलाची आर्थिक साथ मिळाली.
जिथे पर्याय म्हणून कोणी नसतं...तिथं स्वतः छाती काढून संकटांसमोर उभा राहायचं असतं...अशा अनंत अडचणीवर मात करीत कुठलाही क्लास न लावता...सतत दोन वर्षे स्वतः अभ्यास...करून प्रा.तेजस लक्ष्मण पवळ यांनी मागील १ महिन्यात सरकारी I.T.I शिक्षक, तलाठी-महसूल विभाग व मुद्रांक अधिकारी अशा तीन सरकारी पदव्या प्राप्त करून त्यांनी पाहिलेलं सरकारी लाल दिव्याच्या गाडीत बसण्याचं स्वप्न अखेर त्यांनी सत्यात उतरवलं.. !!!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा