*अकलुज -----प्रतिनिधी*
*केदार ----लोहकरे*
*टाइम्स 45 न्युज मराठी
अकलूज येथे रत्नाई कृषी महाविद्यालयातील मेळाव्यात माजी विद्यार्थ्यांचा गौरव केला.
रत्नाई कृषी महाविद्यालयाचे अनेक कृषी पदवीधर विद्यार्थी शासकीय वर्ग-१,वर्ग-२ सेवेत कार्यरत आहेत.काही जण उत्तम दर्जाची आधुनिक शेती करत.प्रत्येकांनी आपापल्या क्षेत्रात नावलौकिक कमवला आहे.त्यामुळे राज्यातील नामांकित कृषी शिक्षण संस्थांमध्ये अकलूजच्या रत्नाई कृषी महाविद्यालयाचा एक ब्रॅड म्हणून उल्लेख होत आहे असे मत शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष जयसिंह मोहिते-पाटील यांनी व्यक्त केले.
अकलूजच्या रत्नाई कृषी महाविद्यालयाच्या सन २००७ ते आजवरच्या कृषी पदवीधर विद्यार्थी आणि गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभ व मेळाव्याचे आयोजन शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अकलूजमध्ये करण्यात आले होते.या वेळी जयसिंह मोहिते-पाटील बोलत होते.
याप्रसंगी शिक्षण प्रसारक मंडळाच्या संचालक स्वरूपाराणी मोहिते-पाटील म्हणाल्या,या कृषी महाविद्यालयाला आज २१ वर्षे पूर्ण होत आहेत.ज्यांच्या नावाने हे कृषी महाविद्यालय चालू केले. त्या श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील यांची हे जन्मशताब्दी वर्ष सुरू आहे.तसेच महाविद्यालयाचे संस्थापक जयसिंह मोहिते-पाटील यांचेही अमृत महोत्सवी वर्ष चालू आहे.त्या पार्श्वभूमीवर हा मेळावा संपन्न होत आहे.हा एक योगायोगच आहे.या कृषी महाविद्यालयातील शिक्षण घेतलेले अनेक जण वेगवेगळ्या क्षेत्रात नावलौकिक कमवत असले तरी आज सत्कार स्वीकारताना ते विद्यार्थ्यांप्रमाणे रांगेतच आले.त्यांनी आपल्या व्यक्तिगत जीवनात महाविद्यालयातील शिस्त व संस्कार आजही विसरले नसल्याचे स्वरूपाराणी यांनी निदर्शनास आणून दिले.या वेळी संस्थेचे माजी विद्यार्थी व तहसीलदार प्रदीप उबाळे,राहुरी कृषी विद्यापीठात दुसरी आलेली अंजली कोरडे आदींनी मनोगत व्यक्त केली.यावेळी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव अभिजित रणवरे,सहसचिव हर्षवर्धन खराडे पाटील,सदस्य व स्थानिक व्यवस्थापन समितीचे सदस्य उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य आर.जी.नलवडे यांनी केले तर प्रा.निलेश माने-देशमुख यांनी सूत्रसंचालन केले.तर आभार प्रदर्शन प्रा.एस.एम.एकतपुरे यांनी मानले.कार्यक्रमाच्या शेवटी जयसिंह मोहिते-पाटील यांनी मेरा मुल्क मेरा देश मेरा ये वतन शांती का उन्नती का प्यार का चमन.. हे देशभक्तीपर गीत वाजवण्यास सांगितले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा