इंदापूर तालुका..... प्रतिनिधी एस. बी. तांबोळी, मोबाईल -8378081147
- पिंपरी बुद्रुक ( ता इंदापूर ) गावचे ग्रामदैवत उदगीरबाबा ( पिरसाहेब ) यांचा ऊरुस सोमवार १ ते बुधवार ३ एप्रिल दरम्यान होणार आहे. मुख्य ऊरुसासह तमाशा व राज्यातील नामांकीत मल्लांच्या कुस्त्यांच्या जंगी मुकाबल्याने यात्रेची सांगता होणार आहे.
इंदापूर तालुक्यातील पिंपरी बुद्रुक येथील सर्वधर्म समभावाचे प्रतीक असणारे उदगीरबाबा ( पिरसाहेब ) यांचा सालाबाद नियम परंपरेप्रमाणे ऊरूस होणार आहे. त्यामध्ये सोमवार १ एप्रिल रोजी मानाच्या संदलच्या मिरवणूकीने बाबांच्या मजारवर संदल चढवण्यात येणार आहे. मंगळवार २ मार्च रोजी मुख्य ऊरुसानिमीत्त विविध स्टॉलसह साहित्य विक्रीची मोठी दुकाने आल्याने मोठी यात्रा भरते. सायंकाळी नऊ वाजता मानाच्या घोड्याची मिरवणूक ( छबीना ) काढण्यात येतो. त्यानंतर प्रकाश अहिरेकरसह निलेशकुमार अहिरेकर यांचा प्रसिध्द लोकनाट्य तमाशा सादर होणार आहे.
तसेच बुधवार ३ एप्रिल रोजी पुणे, सोलापूर, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील नामांकीत मल्लांच्या कुस्त्याने यात्रेची सांगता होणार आहे. गावाच्या परंपरेप्रमाणे पिरसाहेब यात्रेसाठी लोकवर्गणी गोळा करण्यात येते. त्यातून पिरसाहेबांच्या दर्गाहची रंगरंगोटी, गलप ( मजारवरील कापड ), तमाशा, कुस्त्यासाठी त्याचा खर्च करण्यात येत असतो. तसेच गावातील इतर यात्राही त्यातून पार पाडण्यात येतात.
परंपरेप्रमाणे पिरसाहेब यात्रेनिमीत्त माहेरवाशिनी आपल्या संपुर्ण कुटुंबियांसह आपले बोललेले नवस फेडण्यासाठी तसेच पिरसाहेब यांना माशाप्रमाणे नैवेद्य, नारळ फोडण्यासाठी येत असतात. त्यामुळे गाव यात्रेनिमीत्त मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. तसेच पंचक्रोशीत सर्व जाती धर्माचे मानणारे भाविकही मोठ्या प्रमाणात हजेरी लावतात.
फोटो - पिंपरी बुद्रुक गावचे ग्रामदैवत उदगिरबाबा ( पिरसाहेब ) यांची मजार दिसत आहे.
................................
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा