Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, २९ मार्च, २०२४

*"शिवाजी ननवरे" यांची -जम्मू काश्मीर -येथे "सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक" पदावर पदोन्नती*

 


*विशेष----प्रतिनिधी*

*राजु (कासिम)मुलाणी*

 *टाइम्स 45 न्युज मराठी

लक्ष्मीनारायणनगर-अकलूज येथील शिवाजी ज्ञानेश्वर ननवरे यांनी जम्मू काश्मीर येथे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदावर पदोन्नतीद्वारे नुकताच पदभार स्वीकारला.


शिवाजी ज्ञानेश्वर ननवरे हे १९९२ साली केंद्रीय राखीव पोलीस दलमध्ये भरती झाले होते. नागपूर आणि जयपूर येथे ट्रेनिंग पूर्ण करून पंजाब-अमृतसर या ठिकाणी त्यांची बदली झाली. त्यानंतर मणिपूर, आसाम, गडचिरोली, उत्तर प्रदेश, जम्मू काश्मीर आदी ठिकाणी त्यांनी उत्तम सेवा बजावली. त्यांनी गडचिरोली येथील नक्षलवाद्यांशी चकमक असो की, पंजाब, जम्मू काश्मीर येथील अत्यंत प्रतिकूल-कठीण प्रसंगातही त्यांनी जीवाची पर्वा न करता सेवा चोख बजावली. नुकताच त्यांनी जम्मू काश्मीर येथे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक या पदाचा पदोन्नतीद्वारे पदभार स्वीकारला. 

शिवाजी ननवरे यांचे मुळगाव कोळेगाव ता. माळशिरस असून त्यांचे १२ वी पर्यंतचे शिक्षण शंकरनगर येथील महर्षी प्रशालेत झाले आहे. त्यांना मिळालेल्या पदोन्नतीबद्दल कोळेगाव, अकलूज, शंकरनगर आदी विविध स्तरावरून त्यांचेवर अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. 

*मो.-84088 17333


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा