*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो. 9730 867 448
राज्यामध्ये सुरू असलेल्या राजकीय रणांगणात महाराष्ट्रातील शेतकरी पुरता होरपळून निघत आहे. दुष्काळाने तोंड वर काढले असताना शेतकऱ्यांना आधार देणारे सरकार जाणीवपूर्वक निराधार करत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हक्काचे सरकार यावे या दृष्टिकोनातून जनशक्ती संघटनेने महाविकास आघाडी सोबत जाण्याचा निर्णय घेत बारामती येथे शिष्ट मंडळाला घेऊन शरद पवार यांची भेट घेऊन या संदर्भात चर्चा केली. दरम्यान महाविकास आघाडी सोबत जाण्याचा प्रस्ताव अधिकृतरित्या जनशक्ती संघटने कडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे दाखल करण्यात आला आहे.
आज अतुल खूपसे पाटील व जनशक्ती संघटनेच्या शिष्टमंडळाने सिल्वर ओक येथे खा.शरद पवार यांची भेट घेऊन अधिकृतरित्या प्रस्ताव दिला. या प्रस्तावावर सकारात्मक प्रतिक्रिया देत खा. पवार यांनी तातडीने शिवसेना नेते संजय राऊत यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधून यासंदर्भात चर्चा केल्यानंतर जनशक्तीच्या शिष्टमंडळाला सेम प्रस्ताव घेऊन मातोश्रीकडे पाठविले. यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाल्यानंतर शिवसेना पक्षाचे मुख्य नेते खा. संजय राऊत यांच्याशी सविस्तर चर्चा करून महाविकास आघाडीत दाखल होण्यासंदर्भात प्रस्ताव देण्यात आला.
यावेळी संजय राऊत यांनी देखील सकारात्मक प्रतिक्रिया देत राष्ट्रवादी, काँग्रेस व शिवसेनेचे वरिष्ठ लवकरच या संदर्भात निर्णय घेऊन तुम्हाला कळविले जाईल. तुमच्यासारख्या लढाऊ संघटनेची महाराष्ट्राला व महाविकास आघाडीला गरज आहे. येणारी सरकार हे शेतकऱ्यांचे सरकार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
यावेळी संघटनेचे प्रमुख अतुल खूपसे पाटील व समवेत संघटनेचे पदाधिकारी सै अर्चना शाहा भिवरे -पाटील राणा महाराज वाघमारे, गणेश बापू वायभासे, चेअरमन शरद एकाड, तुषार भैय्या, विजय खुपसे उपस्थित होते
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा