*अकलुज ----प्रतिनिधी*
*केदार ---लोहकरे
*टाइम्स 45 न्युज मराठी*
फ्युचर ऑफ ॲग्रीकल्चर या एकदिवशीय राष्ट्रीय परिसंवाद मध्ये अकलूजच्या रत्नाई कृषि महाविद्यालयातील विद्यार्थीनींनी प्रथम क्रमांक पटकावला आहे.
दि.१६ मार्च २०२४ रोजी, पुणे बिजनेस स्कूल,पुणे येथे पार पडलेल्या फ्युचर ऑफ अग्रीकल्चर या एकदिवशीय राष्ट्रीय परिसंवादमध्ये रत्नाई कृषी महाविद्यालय अकलूज येथील विद्यार्थींनी भाग्यश्री नेलोगी, मानसी रक्ताटे,वैभवी देवकर व तन्वी साडेकर यांना मॅड ॲड्स शो प्रकारामध्ये प्रथम क्रमांक मिळाला आहे.त्यांना ट्राॅफी, प्रमाणपत्र आणि रोख रू. ७०००/- पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.तसेच पोस्टर सादरीकरणमध्ये श्रद्धा इंगोले व श्रद्धा जाधव यांनी तृतीय क्रमांक मिळविला.
या सर्व विद्यार्थीनींचे शिक्षण प्रसारक मंडळाचे मार्गदर्शक संचालक जयसिंह मोहिते-पाटील,संस्थेचे अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते-पाटील, संचालिका कु.स्वरूपाराणी मोहिते-पाटील, सचिव अभिजीत रणवरे , सहसचिव हर्षवर्धन खराडे-पाटील आणि महाविद्यालयाचे प्राचार्य आर.जी.नलावडे यांनी कौतुक केले व त्यांच्या पुढील शैक्षणिक कार्यास शुभेच्छा दिल्या.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा