*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448
"मराठा सेवा संघाचे" संस्थापक अध्यक्ष- ॲड. पुरुषोत्तम खेडेकर, यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रीय कार्यकारणी सदस्य व सेवानिवृत्त उप अभियंता ,शिवश्री उत्तमराव माने शेंडगे, विभागीय अध्यक्ष- शिवश्री प्रशांत पाटील, जिल्हाध्यक्ष- शिवश्री तात्यासाहेब पाटील, यांनी बारामती झटका वेब पोर्टल आणि यूट्यूब चॅनल संपादक, शिवश्री-" श्रीनिवास शिवाजीराव कदम पाटील" मु. पो. मळोली ता. माळशिरस जि. सोलापूर यांची मराठा सेवा संघ प्रणित तानुबाई बिरजे पत्रकार संघाच्या सोलापूर जिल्हा अध्यक्ष पदी निवड करण्यात आली असल्याचे नियुक्ती पञ नुकतेच प्रदान करण्यात आले असुन,-
-
मराठा सेवा संघाची विचारधारा समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवून समाजातील प्रत्येक घटकांचे जीवनमान उंचविण्यासाठी सतत कार्यप्रवण व कार्यरत राहून मराठा सेवा संघाच्या आचारसंहितेचे व विचाराचे पालन करणार असल्याचे नूतन सोलापूर जिल्हा अध्यक्ष श्रीनिवास कदम पाटील यांनी सांगितले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा