Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, २० मार्च, २०२४

*"डाॕ.लता अकलुजकर "यांना* *"विद्यार्थी इतिहास परिषद"चा* *"जीवन गौरव पुरस्कार"प्रदान*

 


*टाइम्स 45 न्युज मराठी*

 *मो.9730 867 448


विद्यार्थी इतिहास परिषदे च्या वतीने दयानंद काॕलेज सोलापूर च्या इतिहास विषायाच्या माजी प्राध्यापिका तसेच शंकरराव मोहिते महाविद्यालयाच्या प्रथम बॕच च्या विद्यार्थिनी डाॕ.लता अकलुजकर यांना "जीवन गौरव पुरस्कार "प्राप्त झाल्या बद्दल रविवार दि.17/3/2024 रोजी पुणे येथील नांदेड सिटी मध्ये ज्येष्ठ इतिहासकार ,डाॕ-बी.डी.कुलकर्णी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला  



   याप्रसंगी महाराष्ट्र राज्य प्राचार्य महासंघाच्या वतीने अध्यक्ष आणि शंकरराव मोहिते महाविद्यालयाच्या वतीने माजी प्राचार्य डाॕ. आबासाहेबा देशमुख यांनी डाॕ.लता अकलुजकर यांचा ग्रंथ व शाल देऊन सत्कार केला.



डॉक्टर सौ लता अकलूजकर यांचे शिक्षण एम. ए . पीएच.डी. ( इतिहास) झाले असून शंकरराव मोहिते महाविद्यालयात पहिल्या बॅचमध्ये इतिहास या विषयांमध्ये बी.ए. ला शिवाजी विद्यापीठात सर्वप्रथम येऊन त्या अकरा स्कॉलरशिप च्या मानकरी ठरल्या होत्या . दयानंद महाविद्यालय ,सोलापूर येथे 1980 ते 2013 या कालावधीत इतिहास विभाग प्रमुख म्हणून अध्यापनाचे कार्य केले. या कालावधीत इतिहास संशोधनास आपले जीवन अर्पित केले. संशोधन म्हणजेच धर्म, संशोधन म्हणजेच ध्यास हे लक्षात घेऊन त्यांनी अनेक आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय राज्यस्तरीय इतिहास परिषदांचे आयोजन केले .तसेच दयानंद महाविद्यालय येथे ऐतिहासिक वस्तू संग्रहालयाची स्थापना केली .त्याप्रमाणेच भारतात कदाचित सर्वप्रथमच अशी विद्यार्थी इतिहास परिषदेची स्थापना केली .आजपर्यंत सौ. लता अकलूजकर यांचे पर्यंत एकूण 52 इतिहास ग्रंथ प्रकाशित झाले असून वराह विष्णूचा तिसरा अवतार आणि वीरगळ इतिहासाचे एक साधन हे दोन ग्रंथ प्रकाशनाच्या मार्गावर आहेत .त्यांना मोडी लिपी आणि ब्राह्मी लिपी यासाठी महाराष्ट्र शासन मान्यता आहे .केंद्रीय युनिव्हर्सिटी तर्फे एकूण सात पुरस्कार त्यांना प्राप्त झालेले आहेत त्यामध्ये टॉप हंड्रेड एज्युकेटर्स इन द वर्ल्ड हा मानाचा पुरस्कार मिळालेला आहे. त्यांची अनेक व्याख्याने होतात .वृत्तपत्रातून लेखन होते. मस्तानी हा त्यांचा खूप महत्त्वपूर्ण ग्रंथ असून त्याचे प्रकाशन प्रसिद्ध कादंबरीकार आणि पानिपतकार विश्वास पाटील यांच्या हस्ते झाले होते. अखंडपणे इतिहासाचे संशोधन ग्रंथ लेखन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन हे काम त्यांनी केलेले आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली अकरा विद्यार्थ्यांना पीएच.डी .ही पदवी प्राप्त झालेली आहे हे सर्व योगदान लक्षात घेऊन त्यांना सोलापूर विद्यापीठ अंतर्गत विद्यार्थी इतिहास परिषदेने 2024 चा जीवनगौरव हा सन्माननीय पुरस्कार प्रदान केलेला आहे छत्रपती शिवरायांच्या अठराव्या थेट वारस श्रीमंत सविताराजे भोसले जिंतीकर यांच्या हस्ते त्यांना 5 मार्च रोजी सोलापूर येथे मानपत्र आणि मानचिन्ह असे पुरस्कार प्रदान करण्यात आलेले आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा