Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, २१ मार्च, २०२४

मराठवाड्यातील हिंगोली, परभणी, नांदेड, इत्यादी शहरात "भूकंपाचे "मोठे धक्के

 


*विशेष----प्रतिनिधी*

*राजु (कासिम)मुलाणी*

 *टाइम्स 45 न्युज मराठी* 

*मो.-84088 17333

        आज सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. भूकंपाचे धक्के जाणवताच नागरिक घराबाहेर पडतांना पाहायला मिळाले. काही ठिकाणी 3.6 रिश्टर स्केल तीव्रतेची तर काही ठिकाणी 4.5 रिश्टर स्केल तीव्रतेची नोंद झाली आहे. सकाळी 6 वाजून 9 मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले असल्याची माहिती मिळत आहे. नांदेड जिल्ह्यात सकाळी 6. 9 मिनीटांनी भूकंपाचा धक्का जाणवला, परभणीत देखील सकाळी 6 वाजून 9 मिनिटांनी भूकंपाचा धक्का जाणवला, तर, याचवेळी हिंगोलीत देखील भूकंपचे धक्के जाणवले आहेत. विशेष म्हणजे मराठवाड्यात 1993 नंतरचा सर्वात मोठे धक्के असल्याचे माहिती मिळत आहे.



दरम्यान याबाबत माहिती देतांना एमजीएमच्या खगोलशास्त्र अंतराळ तंत्रज्ञान केंद्राचे संचालक श्रीनिवास औंधकर म्हणाले की, "आज सकाळी 06:08:30 वाजता 4.5 रिश्टर स्केलचा भूकंप झाल्याची नोंद राष्ट्रीय भूकंप मापण यंत्रणेवर दिसुन आली. हिंगोली जिल्ह्य़ातील वसमत तालुक्यात असलेल्या कुरुंदा व दांडेगावच्या उत्तर भागातील रामेश्वर तांड्याच्या उत्तर भागात भूकंपाचे केंद्र असल्याचे दिसून आले. याची खोली 10 किलोमीटर असल्याचे दिसत आहे. लगेचच दुसरा हलका धक्का पहिल्या धक्क्यानंतर अकरा मिनिटांनी म्हणजे सकाळी 06:19:05 वाजता 3.6 रिश्टर स्केलचा भूकंप झाल्याची नोंद राष्ट्रीय भूकंप मापण यंत्रणेवर दिसुन आली.

मात्र या भूकंपाचे केंद्र तिन किलोमीटर दक्षिणेला असलेल्या कुरुंदा व दांडेगावच्या रामेश्वर तांड्याच्या दक्षिण भागात असल्याचे दिसून आले. याही भूकंपाची खोली 10 किलोमीटर असल्याचे दिसत आहे. मराठवाड्यातील 1993 च्या भूकंपानंतरचा हा सर्वात मोठे धक्के असल्याचे औंधकर म्हणाले, अनेक ठिकाणी घरांची पडझड झाल्याची सुद्धा माहिती समोर आली आहे. तर, काँक्रीटच्या घरांना अनेक ठिकाणी तडे गेले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीतीच वातावरण निर्माण झाले आहे. दांडेगाव येथील अनेक सिमेंटच्या घरांना तडे गेले आहेत. तर, काही मातीची घर कोसळली आहेत. त्यामुळे काही प्रमाणात नागरिकांचे नुकसान सुद्धा झाला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा