*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काही वेळापूर्वीच ठाकरे गटाकडून 17 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली. ठाकरे गटाचे नेते अमोल किर्तीकर यांना देखील पक्षाने उमेदवारी जाहीर केली आहे. एकीकडे त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर दुसरीकडे उमेदवारी जाहीर होण्याआधीच ईडीने किर्तीकर यांना समन्स बजावले आहे. यामुळे अमोल किर्तीकर अडचणीत सापडले आहेत.
शिवसेना ठाकरे गटाचे नेते अमोल किर्तीकर यांना वायव्य मुंबईतून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. याच मतदारसंघातून त्यांचे वडील गजानन किर्तीकर हे विद्यमान खासदार आहेत. गजानन किर्तीकर हे सध्या एकनाथ शिंदे यांच्यासोबत असून पुन्हा एकदा निवडणुक लढण्यासाठी ते इच्छुक असल्याची चर्चा आहे. तर, दुसरीकडे या जागेसाठी भाजप आग्रही असल्याचे म्हंटले जात आहे.
काय आहे प्रकरण ?.
कोविड काळात झालेल्या कथित खिचडी घोटाळा प्रकरणात अमोल किर्तीकर यांची चौकशी सुरू आहे. याआधी देखील किर्तीकर यांची चौकशी झाली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा ईडीने चौकशीसाठी समन्स पाठवण्यात आले आहे. त्यामुळे आता निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या किर्तीकरांसमोर मोठे आव्हान असणार आहे.
दरम्यान, कथित खिचडी घोटाळा प्रकरणात आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांना ईडीने अटक केली आहे. आता याच प्रकरणात ईडी पुन्हा एकदा अमोल किर्तीकर यांची चौकशी करणार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा