*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448
सोलापूर लोकसभा मतदार संघात यावेळी चुरशीची लढत होणार असल्याचे स्पष्ट झालंय. काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांच्या विरोधात भाजपने राम सातपुते यांना उमेदवारी जाहीर केलीय. त्यामुळे आता जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना वेगयेताना दिसून येतोय. असे असताना प्रणिती शिंदेंसाठी एक दिलासा देणारी बातमी समोर आलीय. माजी आमदार दिलीप माने हे स्वगृही परत येणार आहेत.
दिलीप मानेंचा 31 मार्च रोजी पक्षप्रवेश
31 मार्च रोजी मुंबईत टिळक भवनामध्ये त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे. त्यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे, आमदार प्रणिती शिंदे देखील उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवण्यात येतीय. दिलीप माने हे दक्षिण सोलापूर मतदारसंघांचे माजी आमदार आहेत. 2019 साली त्यांनी शिवसेनेकडून प्रणिती शिंदेच्या विरोधात निवडणूक देखील लढवली होती. मात्र त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर मात्र ते शिवसेनेत जास्त सक्रिय राहिले नाहीत.
लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दिलीप माने हे आपल्या समर्थकसह काँग्रेसमध्ये परतणार असल्याने प्रणिती शिंदेंसाठी चांगली मानली जात आहे. त्यामुळे दिलीप माने यांचा प्रणिती शिंदेंना आगामी निवडणुकीत नक्कीच फायदा होणार असल्याचे दिसतंय.
आमदार नरसय्या आडम मास्तरांचीही पाठिंबा
माकपचे माजी आमदार नरसय्या आडम यांनी,’महाविकास आघाडीने सोलापूर मध्य विधानसभा आम्हाला सोडावी, लोकसभा निवडणुकीत आम्ही काँग्रेसचा प्रचार करू’ असा प्रस्ताव काँग्रेस समोर ठेवला आहे. प्रणिती शिंदेच्या विरोधात निवडणूक लढवलेली असली तरी भाजपा हाच आपला मुख्य विरोधक आहे, त्यांना हरवण्यासाठी आम्ही महाविकास आघाडीला साथ देऊ अशी भूमिका आडम मास्तरांनी घेतलीय.
याविषयी बोलताना नरसय्या आडम म्हणाले की, ‘आमचे कितीही मतभेद असले तरी आम्ही प्रणिती शिंदे यांच्या प्रचारासाठी तन, मन आणि धन लावून प्रयत्न करू, फक्त त्यानी मध्य विधानसभा मतदारसंघ विधानसभाआम्हाला सोडला पाहिजे. सोलापूर लोकसभा मतदारसंघातील जवळपास दीड लाख मतदार हे माकपचे सदस्य आहेत. आज देशाचे संविधान धोक्यात आहे, इलेक्टोरोल बॉण्डचा इतका मोठा घोटाळा झाला. त्यामुळे आमचा विरोधक हा भाजप आहे, त्यामुळे सर्व मतभेद विसरून सोलापुरात काँग्रेसला साथ देऊ.”असे त्यांनी म्हटलंय.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा