Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, १७ मार्च, २०२४

रोजा आणि विज्ञान*

 



       रोजा म्हणजे फक्त अन्न पाण्याविना राहणे एवढाच अर्थ होत नाही तर संपूर्ण  शरीरावर नियंत्रण ठेवणे  म्हणजेच रोजा . डोळे , कान, हाथ ,पाय आणि  जीभ या अवयवांचा  ही रोजा असतो  .जो रोजेदार अल्लाहचा आदेश ( हुक्म) ध्यानात ठेवून संपूर्णपणे शरीराचा रोजा ठेवतो तो खरा रोजा .त्यालाच अल्लाह कडून बक्षीस ( सवाब ) मिळेल . जो फक्त पोटाचाच रोजा ठेवतो आणि  डोळे , कान ,जीभ,नाक, पाय या कडे दुर्लक्ष करतो तो खरा रोजा होत नाही . *डोळ्यांचा रोजा* म्हणजे वाईट नजर किंवा वाईट काम करणे ,पाहणे या पासून दूर राहणे  फक्त चांगल्या च कामासाठी डोळ्यांचा वापर करणे म्हणजे डोळ्यांचा रोजा .

 *कानाचा* *रोजा* म्हणजे वाईट गोष्टी न ऐकणे पवित्र कुराण मधील  आयत ऐकणे फक्त चांगल्याच गोष्टी ऐकणे यासाठी कानाचा  वापर करणे म्हणजे कानाचा रोजा .

 *जीभ* नेहमी सत्य व  चांगले बोलणे अल्लाहचे नामस्मरण करणे  म्हणजे जिभेचा रोजा . वाईट बोलणे दुसऱ्यांची खिल्ली उडवणे , खोटे बोलणे ,अपशब्द , चहाडी , चुगली या पासून जिभेवर ताबा ठेवणे म्हणजे जिभेचा रोजा .

 *हात  पाय*  फक्त चांगल्याच गोष्टीसाठी हात आणि  पायाचा वापर करणे  कोणाला विणा कारण, मारणे त्रास देणे   टाळले  तरच रोजा ठेवण्याचे( सवाब ) बक्षीस  आपल्याला  अल्लाह कडून मिळते . आपल्या हाताने   लोकांना  दान धर्म ,सद्का ,खैरात करणे ,गरजवंताना मदत करणे , पाच  वेळा नमाज पाठन करणे , शुद्ध आचरणाने  संपूर्ण   दिवस अन्न पाण्याविना  राहून दुष्कर्म त्यागून सत्कर्माने सम्पूर्ण शरीराचा रोजा राखणे  म्हणजे अल्लाहच्या आदेशाचे पालन करणे  होय. रोजामुळे शरीराला अनेक फायदे  मिळतात.

         शास्त्रीय दृष्टीकोनातून रोजे शरीरासाठी चांगल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. अधुनिक रोजा 

 विज्ञान चे जन्मदाता अमेरिकन विद्वानांनी  टाइफाइड च्या रोग्याला जबरदस्तीने दूध पाजले असता त्याची उल्टी  झाली. अनेक उपाय करुन ही प्रयत्नात यश आले नाही.   शेवटी डॉक्टरांनी रोजा प्रमाणे खाने पिने बंद केले  असता रोग्याची प्रकृती सुधारली. डॉ. एनरिले हैल यांनी आपल्या फिजीकल कल्चर  मध्ये  लिहून ठेवले  आहे  की बरगडी  ( फेफडे) चा टी. बी रोगी २०-२५ दिवस रोजे ठेवून तपासणी  केली असता अढळून आले की  टी. बी. चे वैक्टीरिया (जिवाणू) जास्त प्रमाणात नष्ट झाले आहेत. शरीरातील रोजच्या रोज जास्त खाउन पाचक घटकांना जास्त मेहनत करावी लागते. रोजे चालू असता यांना आराम मिळतो त्यामुळे अल्सर सारखे आजारही ठीक होउ शकतात.रोजा मुळे सर्दी, टॉन्सिलाइ‌टीज , दमा, एग्जीमा मुळव्याध  डायबीटीज , कॅन्सर  सारख्या आजारांना  ( रुग्णांना )   फायदा  मिळतो.तंबाखू बिडी सिगारेट दारू, शरीरासाठी घातक आहेत तंबाखू   मध्ये निकोटीन नामक नशीला पदार्थ असतो  तो मस्तिषक आणि  शरीरावर वाईट परिणाम करतो ज्याच्यामुळे फुफुसाचे आजार , अल्सर, कॅन्सर सारख्या खतरनाक अजाराची जास्त शक्यता असते रोजा मुळे या व्यसनांवर नियंत्रण ठेवता येते व्यसन सोडवन्यासाठी रोजा फायदेशीर ठरतो .  तंबाखू, गुटख्याचे व्यसन हे शरीर विघातक आहे या व्यसनामुळे शरीराला नुकसानच होते हे माहित असून ही व्यसनी लोकांना या सवयी पासून दूर राहणे अशक्य वाटते .महिलांमध्ये मशेरी लावण्याचे व्यसन  जास्त प्रमाणात दिसून येते त्यांना घरातील लोकांनी किंवा डॉक्टरांनी कितीही समजावून सांगितले की यामुळे शरीराचे नुकसान होते दूर रहा या व्यसनापासून  तरीही ज्या महिलांना मशेरीचे व्यसन आहे  त्या मनावर ताबा ठेऊ शकत नाहीत आणि सतत च्या व्यसनामुळे कॅन्सर ,सारखे महा भयंकर आजार उद्भभवण्याची दाट शक्यता निर्माण होते .थोडक्यात ज्या व्यक्ती दारू तंबाखू गुटखा मशेरी या नशिल्या पदार्थांच्या सेवणामुळे   व्यसनाधीन झालेले असतात त्यांना या व्यसनातून बाहेर काढणे अशक्य होऊन जाते डॉक्टर माणसोपचार तज्ञ ही आपले सर्व  उपाय करून  थकतात  . तेव्हा रोजा एक जालीम  उपाय ठरतो   व्यसनी लोकांचे ब्रेन वॉश करण्याचे , माईंड डायव्हर्ट  करण्याचे एकमेव  परिणामकरक  उपाय रोजा ठरते . रोजा म्हणजे फक्त खाण्या पिण्यावर नियंत्रण नसून आपल्या भाव भावनांवर नियंत्रण ठेवणे वाईट वृत्ती पासून दूर राहणे सत्कर्म करीत राहणे सहणशीलता अंगी बाळगून जगणे . जेव्हा  व्यक्ती रोजा मध्ये असतात तेव्हा अल्लाहची उपासना करण्यासाठी सत्कर्म करीत  राहण्याची भावना मनात राहते रोजा असताना भूख लागते तहान लागते परंतु कितीही भूख  लागली तरी ,किंवा आपल्या समोर पंच पक्वन्नाने  भरललेले ताट असले तरी खाण्याची इच्छा होत नाही खुप तहान लागली समोर थंडगार पाणी आहे परंतु  आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवून रोजा असणारी व्यक्ती अन्न पाणी त्याग करतो म्हणजेच आपल्या शरीरावर मनावर भावनांवर नियंत्रण ठेवतो  आणि  आपसूकच सहनशीलता वाढीस लागते . व्यक्ती व्यसनांपासून ही  दूर दूर जाऊ लागतो  आणि त्याला या नशिल्या  पदार्थांचा  विसर पडत जातो . परिणामी व्यक्ती व्यसनमुक्त होतो  .

        रोजा मुळे   शरीरारात  साठलेली अतिरिक्त  चरबी, विषारी द्रव्ये शरीराबाहेर फेकली जातात, वजन कमी होते मनावर ताबा राहतो, सहनशीलता वाढते व अनेक आजारांना थोपवन्यास मदत होते.रोजे चालू असताना सुरुवाती ला तीव्र  गतीने वजन कमी होते त्यामुळे आपल्या शरीरातील जमलेल्या  गुलोकागौन' चे ग्लुकोज मध्ये बदल होतो कारण शरीराला ताकत मिळावी . या बरोबरच शरीरातील पाण्याची लेवल योग्य होते. व शरीरात साठलेले, विषारी द्रव्य शरीराबाहेर फेकली जातात व शरीर निरोगी राहते. प्रत्येक वस्तूची सफाई केली जाते. त्याच प्रमाणे शरीराची सफाई रोजा मुळे होते.म्हणून उत्तम आरोग्यासाठी रोजे आत्यंत फायदेशीर  ठरतात . 



   *नूरजहाँ फकृद्दीन शेख*

       गणेशगाव 

ता. माळशिरस जि. सोलापूर

मो. 9370966948

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा